माजी आमदार वैभव नाईक यांची माहिती
शिवसेना एसटी कामगार सेनेच्या पदाधिकारी व सदस्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे केले आवाहन
एसटी कामगारांची वेतनवाढ व भत्ते यामधील प्रलंबित असलेला आर्थिक फरक मिळावा या मागणीसाठी १३ ऑक्टोबर २०२५ पासून एसटी महामंडळ संयुक्त कृती समिती मार्फत तीव्र स्वरूपाचे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांनी पाठिंबा जाहीर केला असून सिंधुदुर्ग शिवसेना एसटी कामगार सेनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वैभव नाईक यांनी केले आहे.
१ एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीच्या वार्षिक वेतनवाढच्या १ टक्के वाढीव दर आणि घरभाडे भत्त्याची वाढीव दराची थकबाकी मिळावी, सन २०१८ पासुन प्रलंबित महागाई भत्त्याचा फरक, १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२४ या चार वर्षाचा ६ हजार ५०० रुपये वेतनवाढीचा प्रलंबित फरक, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ५५ टक्के महागाई भत्ता, घरभाडे भत्ता दर १०, २०, ३० टक्के दराने लागू करा, १५ हजार रुपये दिवाळी भेट, १२ हजार ५०० रुपये सण उचल,कंत्राटी नोकरभरती रद्द करून नियमित नोकरभरती प्रक्रिया राबविण्यात यावी, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांचे वेतन करण्यात यावे, संपूर्ण थकबाकीची रक्कम एकरकमी अदा करण्यात यावी, निवृत्त कर्मचाऱ्यांना १ वर्षाचा मोफत पास,सेवानिवृत्त कामगारांची थकीत देणी एकरकमी देण्यात यावी, पीपीपी तत्वावर महामंडळाच्या जागांचे विकास करण्याऐवजी महामंडळाने सदर जागा स्वतः विकसित कराव्यात अशा विविध एसटी कामगार हिताच्या मागण्यांसाठी एसटी महामंडळ संयुक्त कृती समितीतर्फे हे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
1
/
90
कणकवलीत “त्या” युवतीवर आक्षेपार्ह पोस्ट; परप्रांतीय युवकाला चोप, पुन्हा राडा! #kankavali
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद रविवारी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद १७ मे रोजी
कोलगाव येथे थांबलेल्या दुचाकीला ट्रकची धडक...!! #sawantawadi #kolgaon
तुमच्यापेक्षा आमचे नगरसेवक हुशार आहेत - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #vaibhavnaik
आमच्यासाठी आमचा धर्म मोठा... राजकारण नाही - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर वडिलांना सांगून त्यांची पक्षातून हकालपट्टी करून दाखवा
हिंदू धर्म पोखरायला निघालेल्या माणसाचा पुळका वैभव नाईकांना कशासाठी - आ. निलेश राणे #nileshrane
पिग्मी एजंटावरील जाचक जीआरची होळी करणार - सुशांत नाईक #sindhudurg #kankavali
कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी... बालगोपाळांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद #kudal
आता विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार - आमदार प्रमोद जठार #pramodjathar
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
1
/
90


Subscribe










