उबाठा सेनेचे वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची पक्षातून हकालपट्टी

वैभववाडी : वैभववाडी उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सचिव विनायक राऊत यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती उबाठा सेना मध्यवर्ती कार्यालय यांच्याकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

मंगेश लोके हे गेली अनेक वर्ष सेनेत कार्यरत होते. उबाठा सेनेत ते काही वर्ष तालुकाप्रमुख पदावर कार्यरत होते. पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्या हकालपट्टीचा फटका निश्चित उबाठा सेनेला पुढील काळात बसणार आहे.

error: Content is protected !!