शिरोडा येथे बुडालेल्या ४ पर्यटकांपैकी एकाचा मृतदेह सापडला

वेंगुर्ला : तहसीलदार वेंगुर्ला यांचेकडून प्राप्त माहितीनुसार बुडालेल्या 04 पर्यटकांपैकी फरहान मोहम्मद मणियार, वय वर्षे 20 , राहणार कुडाळ यांचा मृतदेह आढळून आला.

काल शिरोडा येथील समुद्रात बुडालेल्या ९ पर्यटकांपैकी २ जणांना वाचवण्यात यश आले असून ३ जणांचा मृत्यू झाला होता. तर उर्वरित ४ जणांचा शोध सुरू होता. त्यापैकी एकाचा मृतदेह किनाऱ्यालगत दिसून आला. परंतु लाटेबरोबर तो पुन्हा समुद्रात वाहून गेले. ड्रोन द्वारे त्याचा शोध सुरू असून फरहान मोहम्मद मणियार (वय वर्षे 20) राहणार कुडाळ असे त्याचे नाव आहे. इतर ३ जणांचा शोध सुरू आहे.

error: Content is protected !!