८ वा राष्ट्रीय पोषण महाअभियान उत्साहात साजरा…..

उंबर्डे बिट यांचं आयोजन..

पोषणपरी ठरली कार्यक्रमाचं खास आकर्षण…

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय वैभववाडीच्या उंबर्डे बीट च्या पर्यवेक्षिका श्रीम. विद्या संतोष गुरखे यांच्या मार्गदर्शनाने आठवा राष्ट्रीय पोषण महाअभियानातर्गत रानभाज्या पाककला महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

या अभियानांतर्गत ,”पोषण भी पढ़ाई भी “,”सोनेरी एक हजार दिवस “,”आरंभ मेंदूची वाढ व विकास “,”एक पेड माँ के नाम” “बालकांच्या संगोपनामध्ये बाबा पालकांचा समावेश ” ,”आहारामध्ये स्थानिक भाज्यांचा वापर” किती महत्त्वाचा आहे यासारख्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण पोषण परी होती . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गट विकास अधिकारी रामचंद्र जंगले, बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली काकडे, आरोग्य विस्तार अधिकारी सुप्रिया कांबळे, अंगणवाडी पर्यवेक्षिका विद्या गुरखे ,भुईबावडा गावचे सरपंच बाजीराव मोरे ,उपशिक्षक सुमित चिकुर्डेकर सर ,उंबर्डे बीट मधील सर्व अंगणवाडी सेविका , मदतनीस व पालकवर्ग उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी जंगले यांनी आहार मध्ये स्थानिक भाज्या व रानभाज्यांचा वापर आरोग्यासाठी किती महत्वाचा आहे हे सांगितले बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली काकडे यांनी,” सोनेरी एक हजार दिवस बाळाचे” या विषयावर मार्गदर्शन केले. या बिटच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका विद्या गुरखे यांनी आहारातील पोषण थाळीचे महत्व- हिरव्या पालेभाज्या, लाल व हिरव्या रंगाच्या फळभाज्या,तूप, दूध, अंडी, मासे,मटण,चिकन व कोकणातील रानभाज्यांचा सामावेश आहारात असावा यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात पोषण, शिक्षण आणि स्थानिक आहारपद्धती यांचा सुंदर संगम साधण्यात आला.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण:

“रानभाज्यांपासून पोषण परी” तयार करणेत आली. ती परी सर्वांना आहारामध्ये रणभाज्यांचा वापर करा असे सूचित करत होती.

▪️ प्रदर्शनातील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ:

  • आळुचे फ्राय बोंबील
  • अळूची बिर्याणी
  • नाचणीचे नानकटाई

या पाककृतींमधून “सोनेरी १००० दिवस” आणि “पोषण भी पढाई भी”आरंभ-मेंदूची वाढ व विकास या संकल्पनांचा प्रभावी संदेश देण्यात आला. यावेळी उंबर्डे बिटमधील सर्व अंगणवाडी सेविका व मतनीस यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

error: Content is protected !!