तब्बल ३३ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त
सावंतवाडी : सावंतवाडी मार्गावर न्हावेली येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने गोवा बनावटीच्या दारूवर कारवाई केली. या कारवाईत तब्बल ३३ लाख ९३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. यामध्ये ३० लाख रुपये किमतीची फॉर्च्यूनर कार व ३,९३,६००/- किमतीच्या गोवा बनावटीच्या दारूचा समावेश आहे.
यामध्ये केसाराम बेचाराम देवासी रा. अगरवाडा गोवा, हडमतसिंग वचनसिंग चौहान रा. मांद्रे, गोवा, ईश्वर सिंग रा. मांद्रे, गोवा (सर्वजण मूळ रा. जल्लोर राजस्थान) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ अ, इ ,८१, ८३ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२),३१८(२),३३६(२)(३),३४०(२),३(५) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नायोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार विल्सन डिसोजा, आशिष जामदार, पोलीस अंमलदार महेश्वर समजिसकर यांनी केली.




Subscribe









