झाराप अपघात आंदोलन प्रकरणी माजी आमदारांवर अॅट्रोसिटी दाखल.

अधिकारी वर्गाने आपल्या मर्यादा विसरु नये……

धीरज परब यांचा सुचक इशारा.

झाराप येथे अपघातात शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अपघातानंतर ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन झाले. अनेक वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा मिडलकट बंद केला गेला नाही.यावर हायवेच्या साळुखे यांना लोकांनी जाब विचारला. यावेळी सर्वपक्षीय नेते पुढारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
त्याच ठिकाणी माजी आमदारांनी रागाच्या भरात हायवे अधिकारी साळुंखे यांना मारहाण केल्याची तक्रार साळुंखे यांनी कुडाळ पोलिस स्टेशनमधे केली आहे. अधिकाऱ्याना मारहाण झाली त्या बाबत त्यांनी तक्रार द्यावी याबाबत कोणाचेही दुमत नाही.
परंतु सबंधीत अधिकाऱ्यांने त्या तक्रारीत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा जबाब दिला आहे.यामुळे पोलीसांनी शासकीय कामात अडथळा सोबत अॅट्रोसिटी चा गुन्हा दाखल केला आहे. अॅट्रोसिटी याबाबत कुडाळ पोलिसांना विचारले असता जसा जबाब दिला तसा गुन्हा दाखल केल्याचे सांगून, तपासात शहानिशा करुन निष्पन्न होत नसल्यास अॅट्रोसिटी कमी करणे संदर्भात निर्णय होईल असे सांगण्यात आले. उद्या तपासात अॅट्रोसिटी खोटी ठरल्यास, उलट सबंधीत सांळुखेवर खोटी व खोडसाळ तक्रार करुन यंत्रणेची दिशाभूल केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मनसेची मागणी आहे.

मुळात अधिकाऱ्यांनी चुकीच्या पध्दतीने जातीवाचक अॅट्रोसिटी कायद्याचा आपली बचाव ढाल म्हणून गैरवापर करता कामा नये.
भविष्यात कोणत्याही कार्यालयात लोकप्रतिनिधी, समाजसेवक, ग्रामस्थ जाऊन चुकी / अन्याया बाबत विचारणा करतील तर अधिकारी कर्मचारी अशा कायद्याचा वापर करून सर्वांनाच वेठीस धरतील.

राजकारण सोडा पण ही गंभीर बाब आहे. जिल्ह्यात अशा चुकीच्या प्रथा कोणी चालू करू नये. त्या मुळीच खपवून घेतल्या जाणार नाहीत. अधिकाऱ्यांनी जरुर आपली बाजू मांडावी, न्यायासाठी विविध मार्गांचा अवलंब करावा. परंतु चुकीच्या माहिती सांगुन अशा कायद्यांचा सहारा घ्याल, तर लक्षात असू द्या आपले हात सुद्धा नेहमी दगडाखाली असतात असा सुचक इशारा परब यांनी दिला आहे.

error: Content is protected !!