भोंगा वाजला..आणि गुन्हा दाखलझाला

कुडाळ : कुडाळ येथील मशिदीवर अजान चालू ठेवून दिलेल्या ध्वनीक्षेपक परवानग्याच्या अटी, शर्तींचे भंग केल्याप्रकरणी पान बाजार येथील हुसेन जैनुद्दीन मुजावर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस फौजदार दयानंद चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये असे म्हटले आहे की कुडाळ पान बाजार येथील मशिदीवर चालू ठेवून दिलेल्या ध्वनीक्षेपक परवानगी यांच्या अटी, शर्तींचे भंग केले व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाजा निर्माण होईल असे तृप्ती केले म्हणून हुसेन जैनुद्दीन मुजावर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुडाळ पान बाजार येथील रहिवासी बाळा राणे यांनी पोलिसांचे लक्ष वेधले होते आणि राणे यानी सोशल मीडियावर टीकेची झोड उठवली होती

error: Content is protected !!