माडखोल येथे कारला अपघात

दोन दुचाकींना चिरडले

बाळूमामा दर्शन आटपून तळवडे येथे जात असताना चालकाला झोप अनावर झाल्याने माडखोल बस थांब्यावर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना चिरडले. ही घटना सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्याने घडली यावेळी तेथे बससाठी उभे असलेल्या एका महिलेच्या पायाला दुखापत झाली. तिला तात्काळ सावंतवाडी येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातग्रस्त दुचाकींची स्थिती बघता अपघाताची भीषणता
लक्षात येते. सातुळी बावळाट येथील भास्कर परब तर माडखोल येथील लक्ष्मण गावडे यांच्या दुचाकींचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. घटनास्थळी सावंतवाडी पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे.

error: Content is protected !!