प्रतिवर्षाप्रमाणे घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी रात्रौ 07.00 वाजता श्री. देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित कै. अॅड. अभय देसाई स्मृती सुवर्ण महोत्सवी वर्ष सिंधुदुर्ग जिल्हा स्तरीय भजन स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 50 मृदंगांच्या नादब्रम्हामध्ये आकर्षक, नेत्रदिपक भव्य असा असून मान. श्री. निलेशजी राणे साहेब, आमदार कुडाळ-मालवण मतदार संघ यांच्या शुभहस्ते आणि मान, श्री. दत्ताजी सामंत, उद्योजक मालवण यांचे प्रमुख उपस्थितीत 50 व्या भजन स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळयासाठी श्री. अभिषेक गावडे, नगरसेवक, नगरपंचायत कुडाळ, मेसर्स लक्ष्मीनारायण पेट्रोलियम कुडाळचे मान. अॅड. श्री. विशाल देसाई आणि मान. श्री. ओंकार देसाई, आणि श्री. विजय देसाई उद्योजक यांची उपस्थिती राहणार आहे.
उद्घाटन सोहळा संपल्यानंतर रात्रौ 09.00 वाजता श्री. सिध्देश्वर भ.मं., तुळस यांचे स्पर्धेचे उद्घाटनाचे भजन होईल. स्पर्धेमध्ये पुढीलप्रमाणे भजने राहतील.
दि. 23, रा. 09.00 वा. श्री देवी सातेरी भ. मं. सातुळी, रा. 10.00 वा. समर्थ राऊळ महाराज भ.मं., पिंगुळी.
दि. 24, रा. 07.00 वा. सिध्दीविनायक भ. मं. जानवली, रा. 08.00 वा उमळकर भ. मं. कुडाळ, रा. 09.00 वा. गुरूकुल भ. मं. कुडाळ.
दि. 25, रा. 08.00 वा. स्वरब्रम्ह भ. मं. देवगड- जामसंडे, रा. 09.00 वा. श्री. देव भोम भ. मं. आंदुर्ले.
दि. 26, रा. 08.00 वा. माऊली भ. मं. कोलझर, रा. 09.00 वा. श्री. देव विश्वकर्मा भ. मं. वाडीवरवडे.
दि. 27, रा. 07.00 वा. कुलस्वामी भ. मं. पावशी, रा. 08.00 वा. दत्तकृपा भ. मं. वैभववाडी, रा. 09.00 वा. जनसेवा भ. मं. वेंगुर्ला, रा. 10.00 वा श्री. देवी माऊली भ. मं. सातोसे.
दि. 28, रा. 07.00 वा. श्री. देव भूतनाथ भ. मं. कोचरा, रा. 08.00 वा. दत्तगुरू भ. मं. वैभववाडी, रा. 09.00 श्री. लक्ष्मीनारायण भ.मं. वालावल, रा. 10.00 श्री. विश्वकर्मा भ. मं. राठीवडे,
दि. 29, रा. 07.00 वा. ब्राम्हण देव भ. मं. पडवे, रा. 08.00 वा. सद्गुरू भ. मं. कुसबे, रा. 09.00 वा. गांगेश्वर कृपा भ. मं. श्रावण, रा. 10.00 वा. स्वरधारा भ. मं. तांबोळी.
दि. 30, रा. 08.00 वा. श्री. स्वामी समर्थ भ. मं. कलंबिस्त, रा. 09.00 वा. श्री. देव रवळनाथ भ. मं. पिंगुळी, रा. 10.00 वा. महापुरूष भ. मं. पिंगुळी.
दि. 01, रा. 07.00 वा. कुलस्वामिनी भ. मं. हिर्लोक, रा. 08.00 वा. सद्गुरू भ. मं. अणसूरपाल, रा. 09.00 वा. राम कृष्ण हरी भ. सेवा संघ पाट पंचक्रोशी, रा. 10.00 वा. विठ्ठल रखुमाई भ. मं. आंदुले.
तरी सर्व रसिक श्रोत्यांनी भजन श्रवणाचा लाभ घ्यावा ही विनंती.














 
	

 Subscribe
Subscribe









