रत्नागिरी मतदार संघात २६ फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी

रत्नागिरी प्रतिनिधी: दिनांक २० नोव्हेंबर रोजी निवडणुकीची रणधुमाळी पार पडली असून आता सर्वांचे लक्ष निकालावर आहे.दरम्यान रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी एकूण 20 टेबल लागणार असून त्यातील 14 टेबलवर ईव्हीएम मशिनची मोजणी 26 फेऱ्यामंध्ये होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून पोस्टल मतदानाची मोजणी होणार असून दुपारी 2 वाजेपर्यंत या मतदारसंघाचा निकाल स्पष्ट होणार आहे.

पाटबंधारे कार्यालयानजीक असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनमध्ये ही मतमोजणी शनिवारी होणार आहे. एकूण 20 टेबल लागणार असून, त्यातल 14 टेबलवर ईव्हीएम मशिनची मोजणी होणार आहे. 5 टेबलवर पोस्टल मतांची मोजणी होणार असून एका टेबलवर ईटीपीबीएस मतांची मोजणी होणार आहे.पोस्टल मतदानाची मोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होणार आहे. तर ईव्हीएम मशिनवरील मतमोजणी सकाळी 8.30 सुरु होणार आहे. 26 फेऱ्यांमध्ये ही मोजणी होणार असल्याने दुपारी 2 वाजेपर्त रत्नागिरी विधानसभेचा निकाल स्पष्ट होणार आहे.

error: Content is protected !!