पिंगुळीत १७ दिवसांच्या बाप्पांना भक्तीमय वातावरणात निरोप

कुडाळ : पिंगुळी येथे १७ दिवसांच्या बाप्पांचे थाटामाटात विसर्जन करण्यात आले. यावेळी अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. कोकणात गणेश चतुर्थीचा सण फार उत्साहात साजरा केला जातो. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बाप्पाचे आगमन होते. दीड, पाच, सात, अकरा दिवस बाप्पाचे एखाद्या लहान बाळाप्रमाणे लाड केले जातात. बाप्पा देखील आनंदाने सर्वांचे प्रेम स्वीकारतो आणि वर्षभरासाठी सर्वांचा निरोप घेतो. आज देखील सतरा दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी सर्वांच्या भावना दाटून आल्या होत्या. अखेर सर्वांच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप देण्यात आला.

error: Content is protected !!