एकूण २३ फेऱ्यात होणार मतमोजणी
चारही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांसाठी वेगवेगळ्या जागा
सावंतवाडी प्रतिनिधी : दिनांक २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुक मतदान पार पाडले असून सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागून राहिले आहे.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवार २३ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी तहसील कार्यालय परिसरात सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. १४ टेबलवर ही मतमोजणी होणार असून एकूण २३ फेऱ्या होणार आहेत. सकाळी ८ पासून मतमोजणी सुरू होऊन दुपारी बारा, एक पर्यंत मतदारसंघाचा निकाल स्पष्ट होणार आहे. यासाठी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली. मतमोजणीचे प्रशासनस्तरावर नियोजन करण्यात आले आहे. तहसलिदार कार्यालयात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. २३ फेऱ्याअंती निकाल स्पष्ट होणार आहे. प्रत्येक टेबलवर दोन कर्मचारी व मायक्रो ऑब्झर्वर असे कर्मचारी असतील. एका बेरीज १४ पेट्यांचा निकाल हाती येणार आहे.मतमोजणीवेळी उमेदवार उमेदवार प्रतिनिधी व काउंटींग एजंट यांना आतमध्ये परवानगी असेल. चोख पोलीस बंदोबस्त व व्यवस्थापन मतमोजणीसाठी करण्यात आले आहे. २३ वा फेरीनंतर कोण बाजी मारली हे स्पष्ट होणार आहे. याबा सहाय्यक निवडणक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमंत पाटील यांनी दिली.
ठीक आठ वाजता मतमोजणीस सुरुवात
या प्रक्रियेसाठी उमेदवार किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधींना सकाळी ७ वाजता मतमोजणी केंद्रात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. ठीक आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी तब्बल दीडशे कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. मतमोजणी सुरू झाल्यानंतर साधारणपणे दोन तासानंतर निकाल स्पष्ट होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
पक्षातील कार्यकर्त्यांसाठी कसे आहे जागेचे नियोजन
दरम्यान, तहसील ऑफिस समोरील राजरत्न कॉम्पेक्स ते वनभवन ही जागा रस्ता पूर्ण मोकळा राहील. यात राजरत्न कॉम्पेक्स ते मिलाग्रीस हायस्कूल महायुती उमेदवार दीपक केसरकर यांचे पक्ष व सहकारी पक्षाचे समर्थक राहतील.तर कुरतडकर निवास ते शिरोडा नाका या रस्त्यावर महाविकास आघाडी चे उमेदवार राजन तेली यांचे पक्षाचे व सहकारी पक्षाचे समर्थक राहतील. दोन्ही ठिकाणी बॅरिकटिंग असेल.याठिकाणी बॅरीकेटिंग केले जाईल. एसटी बस देखील बाहेरील मार्गाने जातील.
बंदोबस्त करिता १० अधिकारी व १५० पोलिस आणि इतर एस आर पी एफ वगैरे सतर्क असतील.उमेदवार यांचे प्रतिनिधी यांना मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेले अधिकृत ओळखपत्र दाखवूनच प्रवेश मिळेल. मनाई आदेश लागू असल्याने त्याचे पालन करणेबाबत संबंधित प्रतिनिधी व समर्थक यांना योग्य ती दक्षता घेण्याबाबत सूचित केले जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.