पावशी केसरकरवाडी येथे ११ दिवसांच्या बाप्पाला भक्तिभावाने निरोप

योगिता कानडे/ कुडाळ

तालुक्यातील पावशी केसरकरवाडी येथे ११ दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन उत्साहात पार पडले. यावेळी अनेकांचं डोळे भरून आले होते.

कोकणात गणेश चतुर्थीचा सण फार उत्साहात साजरा केला जातो. यावेळी कोकणी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यातून बाप्पाच्या भेटीसाठी कोकणात दाखल होतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे थाटामाटात आगमन होते. दीड, पाच, सात, अकरा दिवस बाप्पा पाहुणचार स्वीकारतो. या दिवसात बाप्पाचे एखाद्या लहान बाळाप्रमाणे लाड केले जातात. बाप्पा देखील आनंदाने सर्वांचे ते प्रेम स्वीकारतो. आणि वर्षभरासाठी सर्वांचा निरोप घेतो.

आज देखील 11 दिवसांच्या बाप्पांना टाळांच्या गजरात निरोप देण्यात आला. यावेळी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा आवाजाने परिसर दुमदुमून गेला होता. यानंतर बाप्पाला पारंपरिक पद्धतीने मालवणी भाषेत गाऱ्हाणं घालण्यात आलं. यानंतर बाप्पाला पुढील वर्षासाठी साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला.

error: Content is protected !!