कुडाळ-बांबुळी येथील ३० वर्षीय तरुण बेपत्ता

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील बांबुळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील निवृत्त पोलीस पाटील श्री. शंकर महादेव बांबुळकर यांचा मुलगा, कु. सागर शंकर बांबुळकर (वय ३०), मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते १२:३० या वेळेत कुडाळ शहरातून अचानक बेपत्ता झाला आहे. त्याच्या बेपत्ता झाल्याने कुटुंबीय आणि मित्रमंडळी चिंतेत आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, त्यांनी सागरचा शोध सुरू केला आहे. सागरबद्दल काही माहिती मिळाल्यास, कृपया ९७६४२३४९७३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे. या कठीण काळात सागरच्या कुटुंबीयांना आपल्या मदतीची गरज आहे.

error: Content is protected !!