कुडाळ : येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची अचानक बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील यांना तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे.
या घटनेची पोलीस वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. आपल्या कार्यकाळात अनेक कठीण गुन्ह्यांचा तपास लावून गुन्हेगारांना जेरबंद करण्यात मगदूम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विशेषतः गेल्या एका वर्षात नऊ गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करून त्यांनी गुन्हेगारी विश्वावर वचक निर्माण केला होता.
राजेंद्र मगदूम यांची बदली झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर सध्यातरी API जयदीप पाटील हे कामकाज पाहणार आहेत. त्यांच्याकडे हा तात्पुरता चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, ही बदली नेमकी कोणत्या कारणास्तव झाली, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. परंतु, अत्यंत कार्यक्षम अधिकाऱ्याची अशा प्रकारे तडकाफडकी बदली होणे हा सध्या कुडाळमधील चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
आगामी काळात कुडाळ पोलीस ठाण्याच्या कायमस्वरूपी निरीक्षकपदी कोणाची वर्णी लागते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Subscribe










