योगिता कानडे/कुडाळ : कुडाळ तालुक्यातील ‘गाव कामगार पोलिस पाटील संघटना’ यांची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या निवडीमध्ये श्री. प्रशांत नामदेव धुरी यांची तालुका अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
तालुका पातळीवर संघटनेचे काम अधिक सक्षम करण्यासाठी ही नवीन टीम सज्ज झाली आहे. जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीतील मुख्य पदाधिकारी खालीलप्रमाणे आहेत:
अध्यक्ष: श्री. प्रशांत नामदेव धुरी
उपाध्यक्ष: श्री. संतोष म्हाडगुत आणि श्री. निलेश तुकाराम गुरव
सचिव: श्री. सतिश गोविंद माडये
सह-सचिव: सौ. अदिती देसाई
खजिनदार: श्री. वैभव वसंत धुरी
सल्लागार:श्री. देऊ सावंत
या मुख्य पदाधिकाऱ्यांशिवाय कार्यकारिणीमध्ये सौ. सदफ मुश्ताक खुल्ली, श्री. अमित विलास मराठे, श्री. रमाकांत पांडुरंग जाधव, सौ. पूनम दर्शन तेरसे, श्री. शेखर शिवाजी शेट्ये, श्री. गंगाराम सुरेश पारकर, सौ. दीपा कुबल सौ.शमिका वैभव हरमलकर , सौ .सरोज काजरेकर ,श्री .राजन गंगाराम शिंदे , श्री. सुरेश पांडुरंग नाईक ,सौ .सुवर्णा म्हाडदळकर, श्री .दिलीप भाऊ वराडकर ,श्री .हेमंत वारंग ,श्री .अनंत कुडाळकर श्री .रणजीत परब यांची निवड करण्यात आली .
तालुक्यातील पोलिस पाटलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि संघटनेची ध्येयधोरणे राबवण्यासाठी ही नवनिर्वाचित कार्यकारिणी कार्यरत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या निवडीबद्दल नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


Subscribe









