कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ शहरातील विद्यार्थ्यांसाठी उद्या ६ मे व ७ मे रोजी महायुती कार्यालय येथे मोफत दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी दिली आहे.
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षाच्या शैक्षणिक प्रवेशासाठी विविध दाखले लागतात हे दाखले विद्यार्थ्यांना मोफत स्वरूपात मिळावे म्हणून कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ शहरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत दाखले वाटप शिबिर आयोजित केले आहे या शिबिरामध्ये उत्पन्नाचा दाखला, वय अधिवास दाखला, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, अल्पभूधारक दाखला देण्यात येणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी या दाखल्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्र घेऊन यावीत असे आवाहन शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी केले आहे.