वैभववाडी तालुक्यातील विवाहित शिक्षिका बेपत्ता

वैभववाडी : तालुक्यातील सोनाळी चव्हाणवाडी येथील जि.प शाळेत कार्यरत असलेल्या विवाहित शिक्षिका पुजा अनिल पोवार (वय ३४) ह्या १मे पासून बेपत्ता आहेत. त्यांचे पती अनिल यशवंत पोवार (रा. सिध्दनेर्ली, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांनी याबाबत वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा या सोनाळी येथील चव्हाणवाडी शाळेत शिक्षिका आहेत. त्या १ मे ला सकाळी शाळेत आल्या होत्या. शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या घरी परतल्या नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही काहीच माहिती मिळाली नाही. अखेर २ मे ला तिचे पती अनिल यांनी आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार वैभववाडी पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलीसही या महीलेचा शोध घेत आहेत. वरील फोटोत दिसणारी महिला कुठे निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!