ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचाच डंका…

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवण विधानसभेत विजयी घोडदौड कायम

नुकत्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत कुडाळ-मालवण विधानसभेत शिवसेनेचा वरचष्मा पुन्हा एकदा कायम राहिला आहे. जिल्हा परिषद निवडणुकी नंतर आता आमदार निलेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवण विधानसभेतील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत कुडाळ तालुक्यातील कडावल संपूर्ण ग्रामपंचायत आणि गावराई, चेंदवन, बांबूळी, अणावं ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे मालवण तालुक्यातील वराड सरपंच आणि धामापूर सदस्यपदी शिवसेनेने बाजी मारली आहे. तर चौके सरपंच गाव पॅनेलकडे गेले आहे.. या पोटनिवडणुकीत कालेली वगळता सर्व जागांवर शिवसेनेने आपला शिक्का उमटवला आहे. त्यामुळे सर्व स्थरातुन पुन्हा एकदा आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वातचे कौतुक होत आहे.


या पोट निवडणूकां मध्ये कुडाळ तालुक्यातील कडावल ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून सरपंचांसहित सर्व ग्रामपंचायत सदस्य तर चेंदवन ग्रामपंचायत मध्ये 3 पैकी 2 सदस्यपदी शिवसेना पक्षाच्या सायली नाईक आणि अनुष्का ठूबरे यांनी एकतर्फी विजय संपादित केला आहे. गावराई ग्रामपंचायत सदस्यपदी शिवसेना पक्षाच्या अक्षता अमित राणे तर अणाव ग्रामपंचायत सदस्यपदी हे तर बांबूळी ग्रामपंचायत सदस्यपदी दीप्ती परब आणि निवजे ग्रामपंचायत सदस्य पदी कृष्णा वामन चव्हाण हे बिनविरोध निवडून आले आहेत.

त्याचप्रमाणे मालवण तालुक्यातील वराड सरपंचपदी या एकतर्फी निवडुन आल्या आहेत. धामापूर ग्रामपंचायत 2 पैकी 2 सदस्यपदी शिवसेना पक्षाचे उमेदवार एकतर्फी निवडून आले आहेत..
या सर्व विजयी उमेदवारांचे आमदार निलेशजी राणे यांनी अभिनंदन केले असून त्यांना भविष्यात गावाच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा निधी अपुरा पडू देणार नाही असे आश्वासन दिले आहे.

error: Content is protected !!