आमदार निलेश राणे यांच्याकडे कुडाळ येथे सुपूर्त
कुडाळ प्रतिनिधी
लाडकी बहिण योजना राबवणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणीकडून आभार पत्र व राखी भेट आमदार निलेश राणे यांच्या जवळ कुडाळ येथे सुपूर्त करण्यात आले तसेच आमदार निलेश राणे यांना महिला शिवसेनेच्या वतीने रक्षाबंधन करण्यात आले.
कुडाळ येथील महायुतीच्या संपर्क कार्यालयात महिला शिवसेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणींचे आभार पत्र व राखी आमदार निलेश राणे यांच्याजवळ सुपूर्त करण्यात आले. त्यानंतर आमदार निलेश राणे यांना रक्षाबंधन महिला शिवसेनेच्या वतीने करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर अरविंद करलकर, सरचिटणीस दादा साईल, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर उपस्थित होते. तर महिला शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, युवती सेना प्रमुख सोनाली पाटकर, जिल्हा महिला सचिव आशा ओळप्पी, नूतन आईर, रेवती राणे, श्रुती वर्दम, दीक्षा सावंत, रचना नेरुरकर, नगरसेविका चांदणी कांबळी, अनुप्रिती खोचरे, वैशाली पावसकर आदी महिला उपस्थित होत्या.













