ग्रामीण रिक्षा स्टॅन्ड माजी तालुकाध्यक्ष बाळा कुंभार यांचे गौरवोद्गार
कुडाळ : प्रतिवर्षाप्रमाणे सिंधुदुर्ग कुडाळ तालुका रिक्षा व्यवसायिक चालक – मालक संघटनेच्या वतीने व शिवसेना शिंदे गट यांच्या संयुक्त विद्यमाने नारळी पोर्णिमेच्या सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुडाळ मालवणचे आमदार श्री निलेशजी राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थित नारळ अर्पण करण्यात आला. यावेळी अतिशय सुंदर असे नियोजन करण्यात आलं होतं. गेली अनेक वर्ष सातत्याने या कार्यक्रमाचे नियोजन माजी नगराध्यक्ष, तालुकाध्यक्ष विनायक राणे साहेब करतात. यावेळी कुडाळ तालुका ग्रामीण रिक्षा स्टॅण्ड सदस्य हे उत्साहाने सहभागी होऊन आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा संदेश ही श्री राणे यांना दिला. हा कार्यक्रम निर्विघ्न पार पडण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे ग्रामीण रिक्षा स्टँड माजी तालुकाध्यक्ष बाळा कुंभार यांनी आभार मानले. यावेळी आमदार श्री निलेश राणे साहेब,श्री दत्ताजी सामंत,श्री संजय आग्रे ,नगराध्यक्ष सौ प्राजक्ता शिरवलकर,श्री संजय पड़ते, आनंद शिरवलकर, विनायक राणे,रिक्षा व्यवसायिक पदाधिकारी अध्यक्ष तसेच ईतर मान्यवर उपस्थित होते.