डॉ. परब हॉस्पिटल येथे जनरेटरमध्ये लागली आग

अग्निशामक दल तत्काळ घटनास्थळी दाखल

कुडाळ : जिजामाता चौक येथील डॉ. परब हॉस्पिटल येथे विद्युत जनरेटरमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली. परंतु अग्नशामक दल तत्काळ त्याठिकाणी दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

कुडाळ जिजामाता चौक येथील डॉ. परब हॉस्पिटल येथे विद्युत जनरेटरमध्ये बिघाड झाल्यामुळे जनरेटरला आग लागली होती. परंतु प्रसंगावधान राखत त्वरीत कुडाळच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी कुडाळचे अग्निशामक दलाने तात्काळ त्याठिकाणी दाखल होत आग विझवली. नागरिकांसह रुग्णांचे प्राण वाचले आणि एक मोठा अनर्थ टळला.

error: Content is protected !!