राजाचं मन असलेला नेता – आ. निलेश राणे

मुंबई : शुक्रवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास माहीम येथील शमशुद्दीन शेख नावाच्या व्यक्तीला हार्ट अटॅक आणि ब्रेन हॅमरेज आघात एकाच वेळी झाला. संकटांनी जणू दोन्ही बाजूंनी मारा केला. जवळच असलेल्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यासाठी घेऊन गेले असता जोपर्यंत ऍडमिशन फी भरत नाही तोपर्यंत पेशंटला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करता येणार नाही असे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. हॉस्पिटलची अवाच्या सव्वा असलेली ऍडमिशन फी भरणे देखील पेशंटच्या नातेवाईकांना शक्य नव्हते. पेशंटच्या कुटुंबावर जणू आभाळच कोसळले. त्यांना काय करावे काही सुचत नव्हते अशातच त्यांना आशेचा एक किरण दिसून आला. त्यांनी आज सकाळी साडेआठ वाजता थेट आमदार निलेश राणे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी आमदार निलेश राणे यांनी त्यांना दिलासा देत म्हटले “तुम्ही रडू नका, आमच्या राणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पेशंटचे ऑपरेशन अगदी मोफत करून दिले जाईल, अजून काही सहकार्य लागल्यास आमच्या टीमशी संपर्क साधा तुम्हाला योग्य ती मदत मिळेल.”

आमदार निलेश राणे यांनी शब्द दिल्याप्रमाणे सकाळी १०.०० वाजता राणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पेशंटचे फ्री मध्ये ऍडमिशन करण्यात आले. तसेच पेशंटची होणारी पुढची ट्रीटमेंट पूर्णपणे मोफत करण्यात यावी अशा सूचना हॉस्पिटल प्रशासनाला देण्यात आल्या.

ज्या ज्या वेळी माणसांवर संकटे येतात त्या त्या वेळी मदतीसाठी पहिली हाक ही राणे कुटुंबाला दिली जाते. राणे कुटुंबीय देखील जातपात, धर्म, पक्ष काहीही न पाहता त्वरीत त्यांच्या मदतलीला धाऊन जातात. आमदार निलेश राणे यांनी राणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचवले आहेत. अनेकांसाठी ते जणू प्राणदूत ठरले आहेत. काल घडलेल्या माहीम येथील घटनेनंतर राजाचं मन असलेला नेता म्हणजेच आ. निलेश राणे हे समीकरण सर्वत्र प्रचलित झाले आहे.

error: Content is protected !!