सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने वर्षावास प्रबोधन मालिकेचा उद्घघाटन आणि विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम संपन्न…


सिंधुदुर्ग : दी बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने वर्षावास हा पवित्र बौद्धांच्या ज्ञानवर्धक कार्यक्रमातील एक चातुर्मास कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे वतीने जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्था सिंधुदुर्ग येथील नामदार भाई सावंत सभागृहात सकाळी ठीक १०.०० पासुन ते दुपारी ठीक ४.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला होता. या पवित्र कार्यक्रमाचे निमित्ताने मार्च ते मे २०२५ मधील माध्यमिक, उच्च माध्यमिक व पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष आयु विद्याधर धोंडु कदम यांनी भुषविले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आयु . सुर्यकांत धोंडीराम कदम नागवेकर व आयु. पी. के. चौकेकर हे उपस्थित होते.


या वर्षावास निमित्त कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष आयु विद्याधर धोंडु कदम यांनी वर्षावास, आषाढ पौर्णिमा व पावसाळ्यात एका ठिकाणी वास करणे म्हणजे आषाढ पौर्णिमा, गुरुपौर्णिमा व वर्षावासचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमे या चार महीन्यांचे काळात म्हणजेच माहे जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पावसाळ्यामध्ये जाणे अडचणीचे ठरत होते. कारण नद्यांना आलेल्या पुरामुळे तथागतांनी निर्माण केलेले संघाचे धम्म उपदेशक भिक्खु हे वाहुन जात असत. तसेच सर्पदंश किंवा जंगली श्वापदांचे वावरणे या काळात असल्याने ते धोकादायक ठरत असे. यामुळे धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भ्रमण करणे भिक्खुंना शक्य होत नव्हते म्हणूनच एका ठिकाणी राहुन वर्षा कालावधीत निवास करुन धम्मदेसना देण्यासाठी भिक्खुंना तथागतांनी सुचित केले. यालाच वर्षावास कार्यक्रमाची सुरुवात झाली. वर्षावासाच्या काळामध्ये धम्म आचरणाची सुवर्णसंधी असते . मनाची मानसिकता शुद्ध असणे फार आवश्यक आहे असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग आयु. विद्याधर कदम यांनी वर्षावास प्रबोधन मालिका उद्घघाटन प्रसंगी बोलताना केले . तथागतांनी पहीले प्रवचन याच पौर्णिमेला सारनाथच्या इसिपटन मध्ये केले तेव्हा पाच भिक्खुंनी ग्रहण केले. त्या पंच भिक्खुंनी तथागतांना आपले गुरू मानले. तेव्हा पासून गुरुपौर्णिमा म्हणून आषाढ पौर्णिमा ओळखली जाऊ लागली असेही सांगितले.
दी बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या माध्यमातून वर्षावास प्रबोधन मालिका उद्घघाटन समारंभ तसेच गुणवत्ता मिळवलेल्या यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार कार्यक्रम आषाढ पौर्णिमेच्या शुभदिनी ओरोस येथे संपन्न झाला.
विचारमंचावर प्रमुख पाहुणे भारतीय लोकतंत्रिक समाज महासंघाचे सहसंयोजक सूर्यकांत कदम , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पी.के .चौकेकर ,जिल्हा महासचिव आनंदकुमार धामापूरकर ,कोकण विभाग मुंबई ते सिंधुदुर्ग विभागाचे अध्यक्ष सन्माननीय आयु. सुधीर पिलाजी धामणकर, जिल्हा कोषाध्यक्ष आयु. नंदकुमार बाबुराव कासले हे धम्मपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घघाटन तथागत गौतम बुद्ध आणि बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून करण्यात आले. प्रमुख पाहुणे सन्माननीय सुर्यकांत धोंडीराम कदम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, आपल्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर शीलवान असणे महत्वाचे आहे. आजचे विद्यार्थी समाजाचे भविष्य आहे. त्यानुसार शिक्षण पूर्ण करून नोकरी व्यवसाय करताना सामाजिक जाणीव निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच दुसरे प्रमुख पाहुणे मार्गदर्शन करताना सन्माननीय पी.के. चौकेकर, सामाजिक कार्यकर्ते हे बोलताना म्हणाले की, बौद्ध धम्मातील संस्कार विधी याबाबत विवेचन करताना मनाला सुसंस्कारित करण्याची ती प्रथम पायरी आहे. जे शुद्ध आहे, जे सत्य आहे तेच बुद्ध वचन आहे. ते प्रत्येकांने आपल्या आचरणातून सिद्ध करावे असे सांगून ज्या ज्या महामानवांनी समता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष केला त्या महामानवांच्या विचारांना अभिप्रेत असं कार्य आपल्याकडून घडाव अशी अपेक्षा विद्यार्थी यांचेकडून व्यक्त केली. आपल्या समाजातून प्रशासकीय अधिकारी तयार होण्याची मानसिकता पालकांनी आणि विद्यार्थांनी ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या कोकण विभागीय कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष सुधीर धामणकर यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक व पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा भारतीय संविधानाची प्रत, सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नोकरी सांभाळून कायद्याची परीक्षा संपादन केल्याबद्दल जिल्हा संघटक आयु. संजय रामा पाटील आणि धम्मभगिनी आयुनी वर्षा कासले यांचा विशेष सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमामध्ये महात्मा फुले विकास महामंडळाचे व्यवस्थापक श्री. व्ही. आर. आरेनवरु यांनी उपस्थित राहून अनुसूचित जाती व जमातीच्या व बौद्धांसाठी शासनाने निर्माण केलेल्या विविध योजनांची माहिती दिली.


सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महासचिव आयु. आनंदकुमार विश्राम धामापूरकर यांनी करताना संस्थेने वर्षभरात केलेल्या कार्यक्रमांचा आढावा व करण्यात आलेल्या उपक्रमांबाबत ज्यामध्ये विधीकर्ता उजळणी शिबिर बाबत माहिती दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा महीला उपाध्यक्षा आयुष्यमानीनी पर्णवी शाम जाधव व जिल्हा संघटक ॲड. संजय पाटील यांनी केले.


कार्यक्रमाला कोकण विभागीय कमिटीचे सन्माननीय सदस्य सखाराम उर्फ बबन हरी मालवणकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आयु. सुहास पांडुरंग कदम, जिल्हा संघटक आयु. पुरुषोत्तम मालवणकर, जिल्हा संघटक समाजभूषण आयु. चंद्रकांत भोजू जाधव, जिल्हा संघटक आयु. विष्णु आप्पा अणावकर, सिद्धार्थ कदम, सखाराम मालवणकर, मालवण तालुका अध्यक्ष आयु. सिद्धार्थ मनोहर जाधव, सामाजिक कार्यकर्ते आयु. नरेंद्र बाबुराव पेंडुरकर, तालुका मालवण चे उपाध्यक्ष व चौके ग्रामपंचायतीचे सदस्य आयु. दुलाजी चौकेकर, कुडाळ तालुका अध्यक्ष आयु. हेमंत रामा कदम, कुडाळ तालुका सचिव आयु. प्रवीण भिकाजी कदम, कणकवली तालुका अध्यक्ष आयु. सुधीर पिलाजी धामणकर, कणकवली तालुका सचिव आयु. सचिन विनायक तांबे, कुडाळ तालुका उपाध्यक्ष आयु. सुनील पवार, कुडाळ तालुका संस्कार विभाग प्रमुख आयु. भगवान कदम, विविध गाव शाखांचे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते. तसेच ॲड. वर्षा कासले, सिद्धेश्वर सावंत, महात्मा फुले मागासवर्ग विकास मंडळ सिंधुदुर्ग चे अधिकारी श्री. व्ही. आर. आरेनवरु उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे सन्माननीय पदाधिकारी, सभासद व त्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी कार्यक्रम छान पध्दतीने आयोजित केल्या बद्दल आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात ही विधीकर्ता व कुडाळ संस्कार विभाग प्रमुख आयु. भगवान कदम यांनी त्रिशरण पंचशील या सामुदायिक वंदना, पुजापाठ, त्रिरत्न बुध्द, धम्म, संघ वंदना घेऊन करण्यात आली व सांगता सरणेत्तय घेऊन करणेत आली.

error: Content is protected !!