बोगस शेतकरी दाखला जोडून वेंगुर्लेतील “त्या” जमिनीची खरेदी

माजी आमदार वैभव नाईक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

संगनमताने गैरव्यवहार करत खरेदीखत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले दाभोली येथे यशवंत अमरतलाल ठक्कर उर्फ यशवंतकुमार यांनी खरेदी केलेल्या जमिनीची सखोल चौकशी करण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, राहुल प्रसाद पै, राहणार दाभोली ता. वेंगुर्ले असून दाभोली येथे त्यांच्या नावे असलेले खाते क्रमांक २७८६ मधील सर्वे नं. ७९/१, ७९/२, ७९/३, ७९/४, ७९/५, ७९/६, ७९/७, ७९/८ब/२, ७९/९/१०/२१अ, ८१/१, ८१/३, ८२/४, ८९/६, ८१/८, ८१/९ हे आहेत. सदर सर्व्हे नंबरची जमीन हि श्री. यशवंत अमरतलाल ठक्कर उर्फ यशवंतकुमार यांनी श्री. राहुल प्रसाद पै यांच्या कडून दिनांक ०४/०७/२०२३ रोजी दुय्यम निबंधक वेंगुर्ला यांच्या कडे खरेदी दस्त क्रमांक ५२२/२०२३ दि. ०४/०७/२०२३ ने खरेदी केली आहे.
श्री. यशवंत अमरतलाल ठक्कर उर्फ यशवंतकुमार यांनी बोगस शेतकरी दाखला जोडून सदर जमीन आपल्या नावे केली आहे. हि जमीन खरेदी करताना दुय्यम निबंधक वेंगुर्ले आणि श्रीमती क्रांती लवू निग्रे मंडळ अधिकारी वेतोरे ता. वेंगुर्ला यांनी सदर शेतकरी दाखल्याची शहानिशा न करता आर्थिक संगनमताने गैरव्यवहार करत सदरचे खरेदीखत करून त्याची शासकीय दस्तऐवजांवर नोंद घातलेली आहे.
तरी आपण श्री यशवंत अमरतलाल ठक्कर उर्फ यशवंतकुमार यांच्या शेतकरी दाखल्याची सत्यता पडताळून सदर जमीन खरेदीची सखोल चौकशी करावी अशी मागणी श्री नाईक यांनी केली आहे.

error: Content is protected !!