कॉलेजच्या युवतीला लागला एस. टी. चा पत्रा

पायाला गंभीर दुखापत

देवगड : देवगड तांबळडेग ही गाडी देवगड एसटी स्टँड येथे फलाटावर लावत असताना कॉलेज विद्यार्थांनी एसटीमध्ये बसण्यासाठी लगबग केली, यात कॉलेज युवतीच्या पायाला गाडीचा पत्रा लागून, गंभीर दुखापत झाली असून त्या युवतीला उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती समजताच एसटी आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. मिळालेल्या अधिक माहिती नुसार देवगड आगारातून सायंकाळी ४:१५ वाजता नुसार देवगड आगारातून सायंकाळी ४:१५ वाजता सुटणारी देवगड – तांबळडेग ही गाडी देवगड एसटी स्टँड येथे फलाटावर लावत असताना झालेल्या धक्काबुक्कीत कॉलेज युवती खाली पडली व तिच्या उजव्या पायाला बस चा पत्रा लागल्याने पायाला दुखापत झाली. या कॉलेज युवतीला तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी देवगड युथ फोरमचे अध्यक्ष अँड. सिद्धेश माणगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी नेले.

दहिबाव घाडीवाडी येथे राहणारी संजीवनी नारायण घाडी ही कॉलेज मधील तरुणी देवगड येथे न.शा. पंत वालावलकर महाविद्यालयात इयत्ता बारावी सायन्स शाखेत शिकत आहे. सायंकाळी कॉलेज सुटल्यानंतर ती नेहमीप्रमाणे एसटी स्टँड येथे गाडीसाठी आली.

देवगड आगारातून सायंकाळी ४:१५ वाजता सुटणारी देवगड तांबळडेग एम एच २० डी ११७५ ही बस चालक लवू सावंत व वाहक जे एस कदम हे फलाटावर गाडी लावत असताना फलाटावर उभ्या असलेल्या कॉलेज च्या विद्यार्थांनी गाडी पकडण्यासाठी झुंबड केली असता हा अपघात घडला असून. या घटनेची माहिती समजताच त्या युवतीचे वडील देखील रुग्णालयात आहे. तिच्या पायावर देवगड रुग्णालयात उपचार करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे .

या घटनेची माहिती मिळताच तात्काळ देवगड कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य शरद शेटे तसेच एसटी आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप, देवगड सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजन जाधव, आशिष कदम, प्रवीण सावंत यांनी देखील रुग्णालयात धाव घेतली. या प्रकारामुळे देवगड आगारातील सगळ्या थांबविण्यात आलेल्या एसटी फेऱ्या त्या त्या ठिकाणी सोडण्यात आल्या.

error: Content is protected !!