लाडकी बहीण योजनेच्या यादीतून तुमचं नावं वगळलं आहे का?

कसं पाहणार यादीत नाव आहे की नाही? आणि त्यामागील कारण काय?; वाचा

ब्युरो न्यूज: यंदाच्या निवडणुकीचा टर्निंग पॉईंट ठरलेली लाडकी बहीण योजना खरंतर वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.२१ वर्षाच्या पुढील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.मात्र निवडणुकी दरम्यान ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केले होते त्यांच्यापैकी कित्येक जणांना या योजनेचा लाभ बंद झाला आहे. तसेच मयत लाडक्या बहिणींची माहिती सुद्धा घेण्यात आली आहे.मात्र निवडणुकी नंतर २१ वर्ष पूर्ण झालेल्या लाडक्या बहिणी मात्र अजूनही या योजनेच्या लाभ पासून वंचित आहेत. अशातच आता ज्यांना लाभ मिळत आहे अशा बहिणींना देखील पैसे मिळणे अचानक बंद झाले आहे.

काय आहे कारण?

सरकारकडून पात्र व अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे. या प्रक्रियेनंतर अनेक महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. जर तुमच्या खात्यातही जून महिन्याचा हप्ता आलेला नसेल, तर तुमचे नाव यादीतून वगळण्यात आले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचं नाव अजूनही यादीत आहे की नाही, हे तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे.या योजनेतून २ हजार २८९ महिलाना वगळले आहे.

यादीत नाव कसे तपासायचे?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.‘अंतिम यादी’ (Final List) विभागात क्लिक करा.तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड भरून सबमिट करा.मोबाईलवर आलेला ओटीपी कोड टाका.तुमच्या स्क्रीनवर लाभार्थी यादी दिसेल.त्यात तुमचं नाव आहे की नाही, हे तपासा.महिलांची नावे वगळण्यामागचं कारण काय?सुरुवातीला या योजनेसाठी पात्रतेचे निकष खूप शिथिल होते, त्यामुळे लाखो महिलांनी अर्ज केला. मात्र, युती सरकार आल्यावर पात्रतेसंदर्भात नव्याने नियम ठरवण्यात आले.सरकारी नोकरीत असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

error: Content is protected !!