कर्ली नदीत अनोळखी व्यक्तीची आत्महत्या

थेट पुलावरून घेतली नदीत उडी

ओळख पटवण्याचे आवाहन

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरुरपार येथील कर्ली नदीच्या पुलावरून उडी मारून एका अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी अंदाजे १ ते १:३० वाजण्याच्या सुमारास घडली. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.


घटनेची माहिती मिळताच काही जागरूक नागरिकांनी तात्काळ कुडाळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.


कुडाळ पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या व्यक्तीबद्दल काही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटवून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत होईल.

error: Content is protected !!