शनिवार दिनांक 28 जुन2025 रोजी श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण या विद्यालयात शालेय संसद निवडणूक घेण्यात आली.या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरणे, अर्ज छाननी करणे, मागे घेणे, प्रचार करणे आणि प्रत्यक्ष निवडणूक व मतदार केले. मतदानासाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड व शालेय ओळखपत्र ग्राह्य धरण्यात आले.
मतदार अधिकारी म्हणून विद्यार्थी नेमण्यात आले. मतदार केंद्राध्यक्ष म्हणून भोसले मॅडम यांनी काम पाहिले.तर झोनल ऑफिसर म्हणून धर्णे सर, तर मतमोजणी साठी नाईक सर, कांबळी सर, कांबळी मॅडम, चेंदवणकर मॅडम आणि सांगळे सर यांनी काम पाहिले. मुख्याध्यापक पवार सर , शाळा समिती अध्यक्ष देवेंद्र नाईक, व पालक संदिप चेंदवणकर यांनी मतदान केंद्रावर भेट देऊन शुभेच्छा दिल्या.