कसई – दोडामार्ग येथील घटना
दोडामार्ग : कसई दोडामार्ग गावठणवाडी येथील वयोवृद्ध महिला सुलोचना प्रभाकर साळकर वय वर्षे ८० ही गुरुवारी दुपारी नजीकच्या आपल्या शेतात गेली होती. सायंकाळी साडेसहा वाजले तरी ती घरी आली नव्हती. नातेवाईक यांनी शोध घेऊन देखील ती सापडली नव्हती. त्यामुळे ती कालव्यात पडली असावी या संशयावरून कालव्याचे पाणी बंद करून शुक्रवारी सकाळी शोधाशोध सुरू केली असता तिलारी डाव्या कालव्यात मृतदेह आढळून आला. याची खबर दोडामार्ग पोलीस ठाण्यात दिली. या नंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. ग्रामस्थ यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून तो शवविच्छेदन करण्यासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय नेण्यात आला. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. दोडामार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे.
1
/
105
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
1
/
105


Subscribe










