महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना मिळणार “अत्यावश्यक संच” भेट

उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून अत्यावश्यक संच सुधारित योजनेस मान्यता

शिवसेना कामगार नेते प्रसाद गावडेंची माहिती

इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी तसेच बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य व सुरक्षा आणि कल्याणसाठी शासनाकडून अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. शासनाकडून कामगारांसाठी यापूर्वी ग्रुहपयोगी वस्तुसंच व सुरक्षा संच योजनेचा लाभ कामगारांना देण्यात आलेला असून आता महायुती सरकारने पात्र नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच (Essencial kit) वितरण योजनेस मान्यता दिली आहे. या अत्यावश्यक संचामध्ये पत्र्याची पेटी (Galvanized Trunk),प्लास्टिकची चटई (Plastic Mat), धान्य साठवण कोठी (क्षमता २५ किलो) (Grain Storage Tank) (Capacity 25 Kg), धान्य साठवण कोठी (क्षमता २२ किलो) (Grain Storage Tank) (Capacity 22 Kg), बेडशीट (Bedsheet), चादर (Chaddar), ब्लॅकेट (Blanket), साखर ठेवण्यासाठीचा डबा (क्षमता १ किलो) (एसएस २०२) (Sugar Container) (1 Kg) (SS 202), चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा (क्षमता ५०० ग्रॅम) (एसएस २०२) (Tea Container) (500 gram) (SS 202), वॉटर प्युरिफायर (१८ लिटर) (Water Purifier) (18 ltr) (SS 202) with 2 candle या वस्तूंचा समावेश असून लवकरच या संदर्भातील शासन स्तरावर निविदा प्रक्रिया कार्यवाही राबवून गणेशोत्सवापूर्वी कामगार बांधवांना लाभ देण्याचे धोरण शासनाकडून आखण्यात आले आहे. प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी यांनी रिसर्च प्रमाणित केलेल्या पात्र यादीनुसारच वितरण केले जाणार आहे. याशिवाय नव्याने नोंदणीत झालेल्या कामगारांना सुरक्षा संच वितरणास देखील कामगार विभागाने मान्यता दिली असून लवकरच वितरणा संदर्भात पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती माहिती शिवसेना कामगार नेते तथा स्वाभिमानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीस दिली असून गोरगरीब कामगारांचा संवेदनशीलपणे विचार करून कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या महायुती सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.

error: Content is protected !!