Category महाराष्ट्र

कृषी दिनानिमित्त केंद्रशाळा वेताळ बांबर्डे येथे वृक्षारोपण

कुडाळ : आज महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती दिवशी कृषी दिनाचे औचित्य साधून ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत केंद्रशाळा वेताळ बांबर्डे नंबर १ येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपसरपंच प्रदीप गावडे, नाईक भाऊजी, शाळा…

प्रज्योती फाउंडेशनच्या प्रज्योती पुस्तक पेढी सामाजिक व शैक्षणिक संस्था, जोगेश्वरी, मुंबई यांच्या वतीने त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

संतोष हिवाळेकर / पोईप प्रज्योती फाउंडेशन मुंबई ही संस्था गेली अनेक वर्षे मुंबई सह कोकणात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत.ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी संस्था विशेष प्रयत्न करत आहेत.याचाच भाग म्हणून त्रिमूर्ती…

आंबोली घाटात पर्यटकांच्या हुल्लडबाजीने वाहतूक कोंडी, कुटुंबांना मनस्ताप

आंबोली: “दक्षिण कोकणचे प्रति महाबळेश्वर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीमध्ये सध्या पावसाळी पर्यटनाला मोठा बहर आला आहे. येथील निसर्गरम्य धबधबे, दाट धुके आणि पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरण पर्यटकांना विशेषतः आकर्षित करत आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांतून मोठ्या संख्येने कुटुंबे आंबोलीला…

अपंग महिलेचा खाडीत बुडून मृत्यू

देवगड तालुक्यातील घटना देवगड : पावणाई धुरीवाडी येथील रेश्मा चंद्रकांत सावंत (४५) या अपंग महिलेचा मृतदेह तिच्या घरानजीकच असलेल्या मोंड- वानिवडे खाडीपात्रात सोमवारी सकाळी ९ वा. च्या सुमारास आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात…

राष्ट्रीय स्तर परिषदेसाठी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांची निवड

दिल्लीत ३-४ जुलैला होणार परिषद कुडाळ : दिल्ली येथे होणाऱ्या शहरी स्थानिक संस्थांच्या अध्यक्षांच्या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेसाठी कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांची निवड झाली असून ३ व ४ जुलै रोजी ही परिषद होणार आहे. राष्ट्रीय स्तरावर शहरी स्थानिक संस्थांच्या…

माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह कार्यकर्त्यांची दोन खटल्यांमधून निर्दोष मुक्तता

कुडाळ : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांची तसेच त्यांच्या सहकाऱ्यांची दोन न्यायालयीन खटल्यांमधून कुडाळ न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्यात केली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त २०१९ मध्ये पेट्रोल दरवाढीविरोधात कुडाळ येथे माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन…

दाभोलीत दिवसाढवळ्या स्थानिक ग्रामस्थांना परप्रांतियांकडून मारहाण होऊनही गुन्हे दाखल नाहीत

स्थानिकांवर अन्याय करणाऱ्या वेंगुर्ले पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांची चौकशी करून बदली करा माजी आमदार वैभव नाईक,परशुराम उपरकर यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

गोव्यात विद्यार्थ्यावर ॲसिड हल्ला

दोडामार्ग कनेक्शन उघड निलेश देसाई अटकेत दोडामार्ग : गोव्यातील धारगळ-पेडणे येथील सुकेकुळण परिसरात सोमवारी (३० जून २०२५) सकाळी एका १७ वर्षीय विद्यार्थ्यावर झालेल्या ॲसिड हल्ल्याचे धागेदोरे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणी गोवा पोलिसांनी सायंकाळपर्यंत दोडामार्गमधील कळणे…

साकवांची दुरुस्ती करा, प्रलंबित भात पिकविमा रक्कम द्या,खतांचा पुरवठा करा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी अकरावीचे वर्ग लवकरात लवकर सुरू करण्याचीही केली मागणी

कर्ली नदीत अनोळखी व्यक्तीची आत्महत्या

थेट पुलावरून घेतली नदीत उडी ओळख पटवण्याचे आवाहन कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरुरपार येथील कर्ली नदीच्या पुलावरून उडी मारून एका अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी अंदाजे १ ते १:३० वाजण्याच्या सुमारास घडली. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली…

error: Content is protected !!