Category News

कुडाळ आगारामध्ये आजच्या दिवशी ठराविकच बसेस उपलब्ध

प्रवाशांचे होताहेत अतोनात हाल कुडाळ : कुडाळ आगारामध्ये आजच्या दिवशी ठराविकच बसेस उपलब्ध असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. कुडाळ आगाराच्या १४ बसेस पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत. तर १४ बसेस स्क्रॅप मध्ये काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी कुडाळ आगारामध्ये…

पाणथळ जागेचे संवर्धन: पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल – प्रा.डॉ. हेदुळकर

वैभववाडी : २ फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानेसामाजिक वनीकरण विभाग वैभववाडी आणि आनंदीबाई रावराणे महाविद्यालय याच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पाणथळ दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन याबाबत जनजागृती करणे…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती बैठक संपन्न

जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ४०० कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा मंजूर करण्यात आला आहे. हा निधी जिल्ह्याच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे. निधी खर्च करत असताना आर्थिक शिस्तीला प्राधान्य असणार…

कुडाळ शहरातील मच्छी मार्केटसाठी असलेली जागा कुडाळ नगरपंचायतीला हस्तांतरित करण्यात यावी

महायुतीच्या नगरसेवकांचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांना निवेदन सिंधुदुर्ग प्रतिनिधीकुडाळ शहरातील मच्छी मार्केटसाठी असलेली जागा कुडाळ नगरपंचायतीला हस्तांतरित करण्यात यावी यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांना महायुतीच्या नगरसेवकांनी निवेदन दिले.…

कुडाळच्या श्री. देवी केळबाई आईचा वर्धापन दिन सोहळा शनिवारी

कुडाळ : प्रतिवर्षाप्रमाणे कुडाळच्या श्री. देवी केळबाई आईचा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न होणार आहे. या दिवशी पुढील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सकाळी १०.०० वा. : लघुरुद्र सकाळी ११.०० वा. : श्री. सत्यनारायण…

कुडाळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे सामाजिक औदार्य

कुडाळ : श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम माड्याचीवाडी येथे कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळच्या अकरावी सायन्स बी च्या विद्यार्थीनी आश्रमातील लाभार्थी यांना जीवनावश्यक वस्तू भेटी दाखल दिला. या वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांना पालकांकडून जो…

“सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी श्रीम. वर्षा मोहीते तर उपाध्यक्षपदी श्री. दिनेश खवळे यांची निवड

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची सभा रविवार दि. ०२/०२/२०२५ रोजी पतसंस्था कार्यालयात सकाळी १०.३० वा मा. श्री.श्रीकृष्ण म. मयेकर आयासी अधिकारी मुख्य लिपिक अधिन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग यांचे…

आर्थिकदृष्ट्या सक्षम करून मच्छिमारांच्या आयुष्यात परिवर्तन आणणार

मत्स्यव्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे पूर्व विदर्भातील मच्छिमार समस्यांबाबत आढावा बैठक माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या पुढाकारातून पूर्व विदर्भातील मच्छिमारांच्या समस्यांबाबत नियोजन भवन येथे आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. राणे बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय…

बांदा येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

बांदा : गाळेल येथील एका युवकाने आपल्या राहत्याघरी गळफास लावून आत्महत्या केली. अक्षय महादेव परब (वय ३०, रा. गाळेल) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. मात्र आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.…

error: Content is protected !!