आ. निलेश राणे यांचा वाढदिवस भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणार

शिवायन ‘ या ऐतिहासिक नाट्याचे मालवण बोर्डिंग ग्राउंड येथे आयोजन

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती

मालवण : कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १६ मार्च रोजी मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर सायंकाळी ‘शिवायन’ या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर निलेश राणे यांचा वाढदिवस मतदार संघाबरोबर संपूर्ण जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अधिवेशन सुरू असल्याने जनतेचे प्रतिनिधी आमदार निलेश राणे अधिवेशनात आहेत. त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे, जनतेचे मांडले जाणारे प्रश्न पाहता कार्यतत्पर असे हक्काचे आमदार जनतेने निवडून दिले हा अभिमान वाटतो. सोमवार १७मार्च रोजी त्यांचा वाढदिवस आहे मात्र आमदार अधिवेशनात असल्याने रविवार १६ मार्च रोजी मालवण कुडाळ मतदार संघात त्यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा केला जाणार आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार किरण सामंत, यांच्यासह महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा होणार असल्याची माहिती दत्ता सामंत यांनी दिली.कुंभारमाठ येथील निवासस्थानी दत्ता सामंत यांची पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी शिवसेना पदाधिकारी महेश कांदळगावकर, बबन शिंदे, महेश राणे, दीपक पाटकर, संतोष साठविलकर, राजू प्रभूदेसाई, विनायक बाईत, पराग खोत, बाळू नाटेकर, अशोक बागवे, श्री. तोडणकर, श्री खवणेकर, अरविंद साटम, निलेश बाईत, विनोद साटम, भाऊ मोरजे, राजू बिडये, मंदार लुडबे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.दत्ता सामंत म्हणाले, आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस भव्य दिव्य स्वरूपात सामाजिक, शैक्षणिक व समस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.१६ मार्च रोजी टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर हिंदवी स्वराज्य निर्मितीचे वैभवशाली शिवपर्व ‘शिवायन’ या सुमारे 100 पेक्षा जास्त कलावंतांच्या सहभागातील महानाट्याचे आयोजन भव्य अश्या रंगमंचावर करण्यात आले आहे. हे महानाट्य सर्वसामान्य शेतकरी, महिला भगिनी यांनाही पाहता यावे. यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

  • रुग्णवाहिका, शाळांमध्ये मेडिकल किट

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एका रुग्णवाहिकेचे लोकार्पणही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मतदार संघातील जास्त विध्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये मेडिकल किट उपलब्ध करून दिले जाणार आहे. अशी माहिती श्री. सामंत यांनी यावेळी दिली.

  • हिंदवी स्वराज्य निर्मितीची वैभवशाली कथा ‘शिवायन’

अवघ्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत शिवछत्रपतींच्या आणि त्यांच्या मर्द मावळ्यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेल्या हिंदवी स्वराज्य निर्मितीची वैभवशाली कथा, शिवपूर्व काळापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतच्या अनेक प्रसंगांचे नाटकातन सादरीकरण म्हणजेच शिवायन ऐतिहासिक महानाट्य आहे. घोडे, उंट यांचा प्रत्यक्ष सहभाग यामध्ये असणार आहे.

error: Content is protected !!