Category अपघात

कणकवली बिडवाडी हायस्कूलजवळ दुचाकी घसरून अपघात

१९ वर्षीय तरुणाचा मृत्यू कणकवली: कणकवली तालुक्यातील बिडवाडी हायस्कूलजवळ सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या एसटी बसला पाहून दुचाकीस्वाराने अचानक ब्रेक लावल्याने दुचाकी घसरली (स्लिप झाली). या अपघातात एका १९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य एक…

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट शेजारी अपघात

दुचाकीला टेम्पोची धडक मोटारसायकलसोबत युवती २० फूट फरफटत गेली खारेपाटण : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट शेजारी काल मंगळवार १३ जानेवारी २०२६ रोजी भारत बेंझ कंपनीचा मासळी वाहतूक करणारा मोठा टेम्पो वाहन क्र. एम एच ०६ बी…

ओरोस जिजामाता चौकात भीषण अपघात

दुचाकीची टेम्पोला धडक, कर्नाटकचा तरुण गंभीर जखमी सिंधुदुर्गनगरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ओरोस परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून, शनिवारी (दि. ११) दुपारी एक भीषण अपघात घडला. जिजामाता चौकासमोरील मिडल कटजवळ गॅस एजन्सीच्या टेम्पोला दुचाकीने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात…

माड्याचीवाडी येथे मिक्सर ट्रक पलटी

चालक जखमी; पुलाच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना झाला अपघात कुडाळ : तालुक्यातील माड्याचीवाडी–रायवाडी नजीक असलेल्या श्री देव ब्राम्हण मंदिराजवळील कॉजवे पुलाचे काम सुरू असताना सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रकचा अपघात झाला. पुलाला आधार देण्यासाठी नवीन भिंतीचे बांधकाम सुरू असतानाच पुलाच्या…

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात;

कणकवलीत २२ वर्षीय युवक जागीच ठार कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर हुंबरट तिठा येथे बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात राजापूर येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीने ट्रकला मागाहून जोरदार धडक दिल्याने हा अपघात…

कुडाळ बाजारपेठेत मध्यरात्री भीषण अपघात.

कुडाळ : कुडाळ बाजारपेठेत मध्यरात्रीच्या सुमारास एका भरधाव बॅलेनो कारने भीषण धुमाकूळ घातला. या अपघातात बाजारपेठेतील स्टॉल्स, उभी वाहने आणि एका एटीएम केंद्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने, ही घटना मध्यरात्री घडल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी बाजारपेठेत भीतीचे वातावरण…

मुंबई – गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे येथे कारचा अपघात

कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे पूल येथे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी कार रस्त्याच्या कडेला कोसळली. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई – गोवा महामार्गाचे काम काही ठिकाणी…

दोडामार्ग बाजारपेठेत थरारक अपघात

दुचाकीस्वार ट्रॅक्टरच्या चाकावर जाऊन आदळला दोडामार्ग : येथील बाजारपेठेत आज दुपारी थरारक आणि विचित्र अपघात घडला. दोन मोठ्या वाहनांच्या मधून रस्ता काढणाऱ्या एका स्कूटरला मागून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून, सुदैवाने तो मोठ्या अनर्थातून…

ओरोस येथे भीषण अपघात; मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक दुभाजकावर चढला

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस येथील राजधानी हॉटेलजवळ बुधवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकने रस्ते दुभाजकाला (डिवायडर) जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रक थेट दुभाजकावर चढला असून यामुळे महामार्गावरील स्ट्रीट…

एस.टी. बसला दुचाकीची धडक

दुचाकी बसला घासत जाऊन एस. टी. च्या दोन्ही चाकांच्या मधोमध अडकली एस.टी. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला दोडामार्ग : समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या एसटी बसला दुचाकीने धडक दिल्याची भीषण दुर्घटना आज सायंकाळी दोडामार्ग तालुक्यातील केळीचे टेंब येथे…

error: Content is protected !!