Category बातम्या

समोरच्या गाडीला साईड देताना डम्परचा अपघात;

चालक सुखरूप, डंपर चे मोठे नुकसान खानोली-देऊळवाडी मार्गावर एका डम्परचा (एमएच ०६ बीडी १००२) भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या गाडीला साईड देताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बारीक खडीने भरलेला डम्पर रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. सुदैवाने, चालक पमू पवार (वय ३८, विजापूर)…

दारू वाहतूक करणाऱ्या क्रेटा कारची थांबलेल्या ओमनीला धडक

बांदा चेकपोस्ट समोरच झाला अपघात; क्रेटाचालक फरार बांदा : दारू वाहतूक करणाऱ्या क्रेटा कारने रस्त्यावरथांबलेल्या ओमनीला धडक दिल्याने दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास बांदा चेक पोस्ट समोरच घडली. अपघातानंतर क्रेटा…

दिल्ली येथील प्रकाश मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यपदी केळवली गावचे सुपुत्र डॉ. जगन्नाथ हरयाण यांची नियुक्ती

राजापूर – राजापूर तालुक्यातील केळवली गावचे रहिवासी, कै. केशव विठोबा हरयाण गुरुजी यांचे सुपुत्र डॉ. जगन्नाथ केशव हरयाण यांची दिल्ली नजीक असलेल्या प्रकाश आयुर्वेद मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर (Prakash Ayurveda Medical College and Research Centre) मध्ये प्राचार्य (Principal) म्हणून…

भाजपच्या युवा मोर्चा ओरोस मंडल अध्यक्षपदी योगेश तावडे

सिंधुदुर्ग : भाजपच्या युवा मोर्चा ओरोस मंडल अध्यक्षपदी योगेश राजाराम तावडे यांची निवड करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे ते समाजकारणामध्ये सक्रिय असून त्यांच्याशी फार मोठा युवावर्ग जोडलेला आहे. त्यांच्या या निवडीमुळे पक्षवाढीसाठी मोठा फायदा होणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल…

वेताळ बांबर्डे उपसरपंच पदी शैलेश घाटकर यांची बिनविरोध निवड

कुडाळ : वेताळ बांबर्डे उपसरपंच पदी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शैलेश घाटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या रूपात वेताळ बांबर्डे गावाला एक तरुण आणि सुशिक्षित उमेदवार उपसरपंच म्हणून लाभला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

गांजा बाळगल्याप्रकरणी वेंगुर्ले येथे एकजण ताब्यात

वेंगुर्ले : गांजा बाळगल्याप्रकरणी वेंगुर्ले पावर हाऊसयेथे एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सोमनाथ पुंडलिक मेणसे (वय २१, रा. मूळ बेळगाव व सध्या हरमल-गोवा) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई सकाळी ७.७५ च्या सुमारास करण्यात आली. त्याच्या कडून २६ ग्रॅम गांजा…

मालवण मेढा येथे विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू

मालवण: येथील मेढा-कुशेवाडा परिसरात रविवारी सायंकाळी एका दुर्दैवी घटनेत विजेच्या धक्क्याने एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील एका विद्युत फ्यूज बॉक्सला स्पर्श झाल्याने ही घटना घडली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ज्ञानेश्वर जनार्दन मुळेकर यांच्या मालकीचा हा बैल होता.…

वेंगुर्ले येथे आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली

एकटाच राहत होता युवक वेंगुर्ले : गेल्या मंगळवारी, २९ जुलै रोजी मानसी पूल येथील खडीच्या पाण्यात तरंगताना आढळलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली आहे. मृतदेह कॅम्प भटवाडी येथील विश्राम अरविंद सावंत (३७) यांचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्याची बहीण…

15 वर्षीय वेदांत विवेक पंडित ‘महाभारताचे अंतरंग’ या पुस्तकाचे प्रकाशन वैद्य परीक्षित शेवडे यांच्या हस्ते संपन्न

कुडाळ : वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी महाभारताचा अभ्यास करून त्यावर पुस्तक लिहिणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमधील 15 वर्षीय वेदांत विवेक पंडित याच्या ‘महाभारताचे अंतरंग’ या पुस्तकाचे प्रकाशन आज सायंकाळी वैद्य परीक्षित शेवडे यांच्या हस्ते झालं. कोव्हिड काळात सहाव्या इयत्तेत असताना…

मुंबई-गोवा महामार्गावर पावशी येथे ऑक्सिजन गॅस गळती

मोठा अनर्थ टळला कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून (क्र. MH01 DR 0757) ऑक्सिजनची गळती झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने, एका जागरुक वाहनचालकाने ही बाब टेम्पोचालक धीरज गुप्ता यांच्या निदर्शनास आणून दिल्याने पुढील मोठा…

error: Content is protected !!