शिवप्रेरीत युवा संघटना दिगशी यांच्या वतीने शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन

वैभववाडी : गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवप्रेरीत युवा संघटना दिगशी यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

          कार्यक्रम 

सकाळी १२.०० वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन

दुपारी १२.३० वा. ढोल नृत्य

दुपारी ०१:०० वा. सर्व शिवभक्तांसाठी स्नेहभोजन

दुपारी ०४.०० वा. महिलांचा हळदी कुंकू समारंभ

सायंकाळी ०५:०० वा. महिलांसाठी संगीत खुर्ची (खेळ पैठणीचा) लहान मुला/मुलींसाठी खेळ उपस्थितीत सर्वांसाठी लकी ड्रॉ

सायंकाळी ०८.०० वा. सुस्वर भजन

सायंकाळी ०९.०० वा. सांस्कृतीक कार्यक्रम व बक्षीस समारंभ

तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन शिवप्रेरीत युवा संघटना दिगशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज चौक दिगशी, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग

error: Content is protected !!