Category बातम्या

ठाकरे सेनेच्या घावनळे व माणगाव विभाग प्रमुख उप विभाग प्रमुख यांची नियुक्ती जाहीर

कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत घावनळे विभाग व माणगाव विभागाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात आला. तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. यावेळी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख…

महाराष्ट्रात मत्स्योत्पादन ४७ टक्क्यांनी वाढले

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या क्रांतिकारी निर्णयांचा परिणाम मुंबई : देशभरातील सागरी मत्स्योत्पादनात घट झाली असताना, महाराष्ट्रासाठी मात्र आशादायी चित्र आहे. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सीएमएफआरआय) अहवालानुसार, २०२४ मध्ये महाराष्ट्राचे सागरी मत्स्योत्पादन ४७ टक्क्यांनी वाढले आहे. विशेष म्हणजे, मत्स्यव्यवसाय…

“सरपंच संवाद” मोबाईल ॲपचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि जल जीवन मिशन यांसारख्या केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांमुळे ग्रामीण भागात स्वच्छता व पिण्याच्या पाण्याचा दर्जा उंचावण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीवर सरपंचांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास अधिक गतिमान व परिणामकारक करण्यासाठी…

सरपंचाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

देवगड तालुक्यातील घटना देवगड : महिलेच्या अंत्यविधीपूर्वी तिच्या मृत्यूबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे लेखी म्हणणे मागितल्याचा राग मनात ठेवून खुडी सरपंच दीपक नारायण कदम (वय ५०, रा. खुडी कावलेवाडी) यांना मारहाण केल्याप्रकरणी तेथील रोहन संजय जोईल (वय २१, रा. खुडी जुवीवाडी)…

नाणोस गावातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न

नाणोस ग्रामपंचायत आणि आदिशक्ती समिती यांचे आयोजन नाणोस ग्रामपंचायत आणि आदिशक्ती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नाणोस गावातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. श्री. विक्रम म्हस्के,…

आमदार निलेश राणे यांनी घेतली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट.

कुडाळ येथील पंचायत संसाधन केंद्र (DPRC) बांधकामासाठी वाढीव निधी देण्याची मागणी. कुडाळ : तालुक्यातील नाबरवाडी येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत सन २०१२ साली ५ कोटींचा निधी मंजूर झाला होता, या केंद्राच्या कामाला देखील सुरुवात झाली मात्र नंतरच्या काळात हे…

पिंगुळीत रेल्वेचे लोखंडी रुळ चोरी होऊनही संबंधितांवर कारवाई न झाल्याने शिवसेना आक्रमक

कणकवली आरपीएफ कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिली धडक पिंगुळी येथील स्मशानभूमीसाठी वापरले चोरी केलेले लोखंडी रुळ आठ दिवसांत दोषींवर कारवाई करा अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा मा. आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर यांचा इशारा

गोवा बनावटीच्या दारूचा कंटेनर वैभववाडी पोलिसांकडून जप्त

३६.९६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वैभववाडी: करुळ तपासणी नाक्यावर वैभववाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत, गोवा बनावटीची दारू घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरला ताब्यात घेतले आहे. या कंटेनरमध्ये तब्बल ३६ लाख ९६ हजार रुपये किमतीचे दारूचे १,१०० बॉक्स आढळले आहेत. ही कारवाई आज…

माणगाव महावितरण कार्यालयाला ठाकरे सेनेची धडक

ग्राहकांवर शासकीय कामात अडथळा केला म्हणून गुन्हे दाखल करा असं आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याने माणगाव खोऱ्यातील वीज ग्राहकांची माफी मागावी कुडाळ : माणगाव खोऱ्यात अनेक ठिकाणी अदानीचे स्मार्ट मीटर ग्राहकांना खोटं सांगून बसविण्यात आले काही ठिकाणी ग्राहकांची परवानगी नसताना बसविले गेले.आता…

कुडाळ भडगाव बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेना पक्षाचे राजेंद्र राणे यांची बिनविरोध निवड

कुडाळ : तालुक्यातील भडगाव बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच अंकिता सावंत यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी आज निवडणूक पार पडली, या निवडणुकीत शिवसेनेच्या राजेंद्र राणे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे, दीपक नारकर शिवसेना कुडाळ उपतालुका…

error: Content is protected !!