कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत घावनळे विभाग व माणगाव विभागाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात आला. तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. यावेळी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने घावनळे पंचायत समिती विभाग प्रमुख पदी पप्पू म्हाडेश्वर , हळदीचे नेरूर पंचायत समिती विभाग प्रमुख पदी पिंट्या उभारे यांची निवड करण्यात आली. तसेच माणगाव विभाग प्रमुख पदी एकनाथ धुरी, उपविभाग प्रमुख पदी शैलेश विरनोडकर व यज्ञेश गोडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी घावनळे विभागाच्या व माणगाव विभागाच्या बैठकीस उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका संघटक बबन बोभाटे, एस.टी. कामगार सेना जिल्हा प्रमुख अनुप नाईक, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, माजी जि.प. सदस्य राजू कविटकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, वसोली सरपंच परब सर, माणगाव सरपंच भोसले मॅडम, आकेरी सरपंच महेश जामदार, माणगाव उपसरपंच बापू बागवे, कौशल जोशी, रुपेश धारगळकर, विष्णू ताम्हणेकर युवा सेनेचे तुषार परब तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच शाखाप्रमुख शिवसैनिक उपस्थित होते.



Subscribe









