कुडाळ भडगाव बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेना पक्षाचे राजेंद्र राणे यांची बिनविरोध निवड

कुडाळ : तालुक्यातील भडगाव बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच अंकिता सावंत यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी आज निवडणूक पार पडली, या निवडणुकीत शिवसेनेच्या राजेंद्र राणे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे, दीपक नारकर शिवसेना कुडाळ उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक यांनी नवनिर्वाचित उपसरपंच श्री राजेंद्र राणे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना उपसरपंच राजेंद्र राणे यांनी आपल्याला उपसरपंच म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले. यावेळी योगेश घाडी, विजय माळकर, विघ्नेश घाडी, भडगाव ग्रामपंचायत सदस्य प्रितेश गुरव, आरती जडये, रोजमारी भुतेलो, अंकिता सावंत, अमिता सावंत तसेच विनोद सावंत, प्रसन्ना गंगावणे, बाळा घाडी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!