ग्राहकांवर शासकीय कामात अडथळा केला म्हणून गुन्हे दाखल करा असं आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याने माणगाव खोऱ्यातील वीज ग्राहकांची माफी मागावी
कुडाळ : माणगाव खोऱ्यात अनेक ठिकाणी अदानीचे स्मार्ट मीटर ग्राहकांना खोटं सांगून बसविण्यात आले काही ठिकाणी ग्राहकांची परवानगी नसताना बसविले गेले.आता त्या मीटर मुळे अनेक लोकांची लाईट बिल चौपट आलीत यासंदर्भात जाब विचारण्यासाठी कार्यालयात धडक दिली. हे स्मार्ट मिटर बसविलेच पाहिजे अशी कुठलीही सक्ती नाही परंतु गाव खेड्यात मीटर फॉल्टी आहे असं सांगून मीटर बसविण्यात येत आहेत.
स्मार्ट मीटर काढून टाकून जुने मीटर पून्हा बसवावेत अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. यात एका महाभाग महावितरण च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने ग्रामस्थांवर, न्याय मागायला येणाऱ्या ग्राहकांवरच शासकीय कामात अडथळा म्हणुन गुन्हे दाखल करा असा आदेशच दिला. त्या अधिकाऱ्याने ग्रामस्थांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थ आपल्या मतांवर ठाम राहिले,त्या अधिकाऱ्याने ग्रामस्थांची माफी मागावी या बद्दल महावितरण चे अधिक्षक अभियंता यांचे माजी आमदार वैभवजी नाईक यांच्या माध्यमातून लक्ष वेधणार असल्याचे युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी यांनी म्हटले.
तब्बल 4 तासांनी वरिष्ठांशी चर्चा करून त्यावर तोडगा काढत शाखा अभियंता शेळके यांनी लेखी पत्र दिले त्यात त्यांनी
1) ग्राहकांच्या लेखी संमती शिवाय स्मार्ट मीटर बसविण्यात येणार नाही
2) ज्यांचं बिल जास्त आलं आहे त्यांचं मीटर बिल दुरुस्त करण्यात येईल
3) हुमरस मधील काढलेले स्मार्ट मीटर सिस्टीम फीड झाल्यास, ग्राहकांच्या मागणी नुसार जुने मीटर बसविण्यात येईल
4) महावितरणचा कर्मचारी (वायरमन) मार्फत स्मार्ट मीटर बसवले जाणार नाही किव्हा स्मार्ट मीटर बसवताना त्यावेळी महावितरण चे कर्मचारी नसतील
यावेळी सर्व ग्रामस्थांनी शिवसेनेच्या शिष्ट मंडळाचे आभार मानले. यावेळीमहावितरण चे शाखा अभियंता श्री शेळके
माजी जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी,माणगाव उपसरपंच बापू बागवे, शिवसेना माणगाव विभागप्रमुख एकनाथ धुरी,शिवसेना घावनळे विभाग संघटक पप्पू म्हाडेश्वर,माणगाव उपविभागप्रमुख शैलेश विर्नोडकर, ग्रामपंचायत सदस्य अवधुत गायचोर, युवासेना शाखाप्रमुख भूषण धुरी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते तसेच ज्या ज्या वेळी लोकांवर अश्या पद्धतीने अन्याय होईल त्यावेळी शिवसेना ठाम पणे त्यांच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास शिवसेना उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी यांनी दिला.