Category बातम्या

लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली शाळेतील विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे आणि पॉस्को कायद्याचे मार्गदर्शन

रोटरी क्लब ऑफ कुडाळ व पोलीस स्टेशन कुडाळ यांचा संयुक्त उपक्रम बुधवार दिनांक २९ जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ कुडाळ व पोलीस स्टेशन कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्हे आणि पॉस्को कायद्याबाबत…

जिल्हा परिषद सदस्या सौ अक्षता राजन गावडे यांना समीर पाटकर मित्रमंडळाच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा

मालवण : जिल्हा परिषद सदस्या सौ. अक्षता राजन गावडे यांना समीर पाटकर मित्रमंडळ नांदरुखच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी समीर पाटकर, सलोनी पाटकर, स्मिता पाटकर, अक्षय पाटकर, अक्षता पाटकर, सायली पाटकर, भक्ती तोंडवळकर, साक्षी कांबळी, दीपिका भगत, श्रुती चव्हाण,चिन्मयी…

अशीही एक अनोखी गुरुपौर्णिमा

सानिका तुळसकर यांनी साजरी केली आश्रमातील निराधार वृद्धांसोबत गुरुपौर्णिमा गुरू पूजा विधी – विधान | गुरू अपार गुणनिधान ||स्वर्गाहून गुरु महान | वंदावे तेची पाय || गुरुपौर्णिमा… गुरू आणि शिष्याच्या पवित्र नात्याचा हा सण… यादिवशी शिष्य आपल्या गुरूविषयीची कृतज्ञता व्यक्त…

युवासेनेच्या कुडाळ तालुकाप्रमुखपदी अनिकेत तेंडुलकर यांची नियुक्ती

कुडाळ : शिवसेनेच्या कुडाळ तालुका युवासेना प्रमुखपदी अनिकेत तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली. आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत मालवण येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या नियुक्तीमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी दत्ता…

आज गुरुपौर्णिमेनिमित्त प. पू. श्री. विनायक अण्णा राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून सानिका तुळसकर यांच्या कार्याचा सन्मान

कुडाळ : बुधवार दिनांक २९ जुलै २०२६ गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सीताराम संजीवनी आनंदाश्रमाच्या मुख्य परिचारिका तथा सानिका केअरटेकरच्या संचालिका सानिका तुळसकर यांना संत राऊळ महाराज मठामध्ये बोलावून सन्मानित करण्यात आले. सानिका तुळसकर यांनी सानिका केअरटेकरच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले असून…

माझा लढा व्यक्तीविरुद्ध नाही, तर होणाऱ्या दिरंघाईविरुद्ध

राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीबाबत जीवन कुडाळकर यांचे स्पष्टीकरण सर्वप्रथम, माझा कोणत्याही महिला अधिकारी, पुरुष अधिकारी किंवा कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याचा वैयक्तिक अपमान करणे, मानसिक त्रास देणे किंवा बदनामी करणे हा कधीही हेतू नव्हता आणि नाही. मी सामाजिक हिताशी संबंधित प्रश्न…

खोल समुद्रातील मासेमारीला १ ऑगस्ट पासून परवानगी; किनारी जलक्षेत्रात १५ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम

किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत मासेमारिस १५ ऑगस्टपर्यंत बंदी कायम नियमांचे पालन करण्याचे मत्स्य विभागाचे आवाहन मुंबई : राज्यातील मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ ऑगस्ट २०२६ पासून खोल समुद्रातील विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) म्हणजेच किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढील खोल समुद्रात मासेमारीला…

जि. प. सदस्य प्रमोद रावराणे यांनी निवडणूक शपथपत्रात स्वतःच्या व पत्नीच्या नावावरील स्थावर मालमत्तेबाबत दिलेली माहिती चुकीची

त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी शिवसेना उबाठाचे कार्यकर्ते स्वप्नील संतोष रावराणे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी कोळपे जि. प. गटाचे जि. प. सदस्य प्रमोद रावराणे यांनी निवडणूक शपथपत्रात स्वतःच्या व पत्नीच्या नावावरील स्थावर मालमत्तेबाबत अपूर्ण व चुकीची माहिती दिली आहे. याबाबत चौकशी करून,…

वृद्धेला शिवीगाळ करत रॉडने मारहाण

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग फरार संशयित ८ तासात पोलिसांच्या जाळ्यात वेंगुर्ले : दारू पिण्यासाठी मागितलेले पैसे दिले नाही म्हणून मनात राग धरून जीवे मारण्याच्या उद्देशाने वेंगुर्ले कॅम्प येथे एका वृद्ध महिलेवर हरेश निकम उर्फ ‘पबजी’ (मूळ रा. चिपळूण,…

पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

वैभववाडी तालुक्यातील घटना करूळ-गावठाण येथील शेतकरी सदानंद हरिश्चंद्र कदम (६०) हे नदीपलिकडे असलेल्या शेतावर जाण्यासाठी नदी ओलांडत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेले. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ८ वा. च्या सुमारास घडली. सह्याद्री जीव रक्षक टीमच्या…

error: Content is protected !!