Sindhudarpan

Sindhudarpan

ॲड. राजेश परुळेकर यांना पितृशोक

सेवानिवृत्त अधीक्षक गजानन परुळेकर यांचे निधन कणकवली प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयातील सेवानिवृत्त अधीक्षक गजानन तातोबा परुळेकर (वय 84, रा. कलमठ शिक्षक कॉलनी) यांचे आज 14 डिसेंबर रोजी सकाळी राहत्या घरी निधन झाले. ऍड. राजेश परुळेकर यांचे ते वडील होत. त्यांच्या…

हेदुळ गावात भरवस्तीत गवा रेड्याचा वावर !

मालवण प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील हेदुळ या ठिकाणी लोहारवाडी मध्ये भर वस्तीमध्ये भर दिवसा गवारेड्याचा वावर असून हा गवा ग्रामस्थांच्या अंगावर जात असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गवा रेड्याकडून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असून दिवसाढवळ्या वस्तीलगत येऊन वावरणाऱ्या…

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत बिघडली

मुंबई प्रतिनिधी: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 97 वर्षीय आडवाणींची प्रकृती मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होती. शनिवारी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मागील 4-5 महिन्यांत चौथ्यांदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात…

विरोधी पक्ष नेते पद कोणाला?

नियमानुसार “या” पक्षाला मिळणार विरोधी पक्ष नेते पद मुंबई प्रतिनिधी: मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटतो न सुटतो तोपर्यंत विरोधी पक्ष नेते पद कोणाला याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. महायुतीने एक हाती सत्ता मिळविल्याने विरोधी पक्ष नेते पद मविआ मधे…

तरुणांनी आपत्ती व्यवस्थापनाचे तंत्र आत्मसात करावे

निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी: राज्यात कोठेही आपत्ती आली तर त्या ठिकाणी NDRF पथकाचे जवान त्वरित पोहोचतात. मात्र एवढ्या मोठ्या राज्यात प्रत्येक ठिकाणी NDRF जवानांना जाणे शक्य होत नाही अशा वेळी स्थानिक तरुणांनी आपत्ती व्यवस्थापनाचे तंत्र आत्मसात करून स्थानिक…

नेरुर विद्यामंदिर हायस्कूल विज्ञान प्रदर्शन संपन्न

कुडाळ प्रतिनिधी: नेरुर विद्यामंदिर हायस्कूल विज्ञान प्रदर्शन पार पडला कुडाळ तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांचा नेरुर हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनास सहभाग घेऊन विज्ञान प्रदर्शन पार पडला. शालेय विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात विविध उपकरणे विज्ञान प्रदर्शनात आज सादर केले. लाईट प्रदर्शन, विद्युत उपकरणे प्रदर्शन,…

भारतातील सर्वोत्कृष्ट हेरिटेज पाककृती चॅम्पियन २०२४ चा अवार्ड युवराज लखमराजे भोंसले व युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांना प्रदान

दिल्ली येथील सोहळ्यात उभयतांचा सन्मान सावंतवाडी प्रतिनिधी : ट्रॅव्हल अधिक लीझर यांचा भारतातील सर्वोत्कृष्ट हेरिटेज पाककृती चॅम्पियन २०२४ हा अवार्ड सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले व युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथे हा सोहळा संपन्न झाला. पाककलेचा…

राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार?

ब्युरो न्यूज: विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दणदणीत विजय मिळाला. त्यानंतर आता राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पण पुढील तीन महिने तरी महापालिका निवडणुका होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून माहिती…

मंत्रिमंडळ विस्तार शपथविधी १५ डिसेंबरला

मुंबई प्रतिनिधी: येत्या रविवारी 15 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं त्यानंतर 5 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र…

कणकवली खरेदी विक्री संघातर्फे भात खरेदी शुभारंभ

कणकवली प्रतिनिधी: कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने शासकीय भात खरेदीचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी (महसुल) कणकवलीचे जगदिश कातकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रतिक्विंटल २३०० रुपयाने भात खरेदी करण्यात येत आहे.या वेळी शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश…