‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो बंद करा

राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची मागणी

मुंबई: काही दिवसांपूर्वी युट्यूबर समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये रणवीर अलाहाबादियानं आई-वडिलांबाबत आक्षेपार्ह्य टिप्पणी केली होती. ज्यामुळे देशभरात खळबळ उडालेली. अशातच आता याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अनेक ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्याच अडकलेल्या रणवीर अलाहाबादियाचे पाय आता आणखी खोलात जाणार आहेत. आई-वडिलांबाबत अश्लील टिप्पणी करणाऱ्या रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने देखील चांगलच फटकारलं आहे तुझ्या डोक्यात घाणच भरली आहे अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने सुनावल आहे. या प्रकरणामुळे रणवीर अलाहाबादिया वर संपूर्ण महाराष्ट्रा संताप व्यक्त करत आहे.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी इंडियाज गॉट लेटेंट शो बंद करण्याची मागणी केली आहे.

नेमकं काय म्हणाल्या रुपाली चाकणकर

अशातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी देखील या प्रकरणावर भाष्य करत कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.या संदर्भात बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमासंदर्भात तक्रार आली होती. हा शो अश्लील असल्याने बंद करावा अशी मागणी केली होती. रणवीर अलाहाबादी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे की, विविध तक्रारी देशभरातून दाखल झाल्या आहेत, त्या एका ठिकाणी कराव्यात आणि रणवीर अलाहाबादी यांना सहकार्य करण्यास देखील पोलिसांना सांगितले आहे. आम्ही निर्णयाचे स्वागत करतो. सोशल मीडियावर अनेक शो सध्या सुरु आहेत. अशा तक्रार आल्यास आम्ही यासंदर्भात कारवाई करु. अश्लील शो बंद करावेत अशी सूचना आम्ही पोलिसांना केली आहे, अशी माहिती रूपाली चाकणकर यांनी बोलतताना दिली आहे.

error: Content is protected !!