कणकवली : बसस्थानक येथे फलाटावर लागणारी व फलाटावरून सुटणारी अशा दोन एसटी बस परस्परांना धडकल्या. दुर्दैवाने बस पकडण्याच्या घाईत असलेली ३० वर्षीय महिला या दोन्ही बसच्यामध्ये सापडून मृत्यूमुखी पडली. ही घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वा. सुमारास घडली. अपघातानंतर महिलेला १०८ रुग्णवाहिकेने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता. तपासणी अंती तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती समजल्यानंतर कणकवली पोलीस तसेच एसटीचे अधिकारी घटनास्थळी व उपजिल्हारुग्णात दाखल झाले होते.