कुडाळ : विधानसभा निवडणूक महायुतीचे उमदेवार डॉक्टर निलेश राणे यांच्या प्रचारार्थ सौ नीलमताई राणे यांनी आंब्रड गावातील मतदाराशी संवाद साधून निलेश राणे यांना प्रचंड मताधिक्यानी निवडून देण्यासाठी आवाहन केले. आंब्रड मतदार संघ हा नेहमी राणे परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे, डॉक्टर निलेश राणे यांना ही सर्वाधिक मतांधिक्य देऊ असा निर्धार या वेळी आंब्रडवासि्यांनी व्यक्त केला.
आंब्रड येथे आयोजित या सभेला पंचायत समिती सदस्य अरविंद परब, बूथकमेटी अध्यक्ष सखाराम परब, हनुमंत मुळीक, सदानंद देवळी, माजी पंचायत समिती सदस्या सौ क्रांती परब, सौ, स्नेहा राऊळ यांनी नीलमताई राणे यांचे स्वागत केले. या वेळी सौ सुप्रिया पाताडे, अस्मिता बांदेकर, सुप्रिया वालावलकरआधी पदाधिकाऱ्यांची समयोचित भाषणे झाली.मुख्यमंत्री लडकी बहीण योजना, सुशिक्षित बेरोजगार योजना, वयोश्री योजना, कलाकार मानधन योजना, तीर्थक्षेत्र योजना, पाचलाख मोफत आरोग्य उपचार योजना, मुली साठी मोफत शिक्षण योजना, रस्ते, पाणी, मोफत घरे आदी विविध योजना मोदी सरकार आणि शिंदे फडणवीस महायुती सरकार च्या लोकोपयोगी योजना चा आढावा त्यांनी आपल्या भाषणातून घेतला.
‘कोणतेही पद नसताना निलेश राणे कुडाळ मालवण मतदार संघातील जनतेच्या सेवे साठी अहोरात्र झटत आहे, गेली दहा वर्षे विरोधी आमदार निवडू दिल्या चा पच्छाताप येथील जनतेला झाला असून विकास कामे तर होतच राहतील परंतु देव, देश धर्म ठीकला पाहिजे तर कट्टर हिंदुत्व धर्माचे रक्षण करणारे सरकार पुन्हा स्थापन होणे आवश्यक आहे, कणकवली मतदार संघ आज विकास कामात आघाडी वर आहे उद्या आमदार झाल्यावर निलेश सुद्धा कुडाळ मालवण मतदार संघ महाराष्ट्र राज्यात नाव लौकिक होईल असे कार्य करील तुम्ही तुमचा मुलगा, भाऊ उभा आहे असं समजुन त्याला भरघोस मतांनी निवडून द्या असे भावनिक आवाहन सौ नीलमताई राणे यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी मधुकर परब, प्रकाश परब, संजय राऊळ, दीपक परब, राजू भोगटे, अनंत परब, बबन पुजारे, प्रवीण राऊळ, दशरथ राऊळ,किशोर ठाकूर, अमित मुंज, मंथन परब, जीवन राणे यांच्या सह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन संदीप परब यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. दिनेश राणे यांनी केले.