नृत्याचा सुरेख प्रवास…
सिंधुदुर्ग : चिमणी पाखरं डान्स अकॅडमी आपल्या विविध संकल्पनांमुळे जिल्ह्यात नेहमी चर्चेत असते. यावेळी देखील नेहमीप्रमाणेच ते तारका ही नवी संकल्पना दर्शकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. यामध्ये आपल्याला नृत्याचा उगम ते नृत्याचा आजवरचा प्रवास पाहायला मिळणार आहे.
. नियम व अटी
१. ‘तारका’ हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातील पहिला व्यावसायिक नृत्य शो आहे. याचे सादरीकरण आम्ही चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, कुडाळ करत आहेत.
२. ज्यांना या शो मध्ये भाग घ्यावयाचा आहे त्यांना ऑडिशन देणे गरजेचे आहे.
३. ऑडिशन देणाऱ्या कलाकाराचे वय १४ वर्षावरील असणे गरजेचे आहे.
४. तुम्ही कोणत्याही डान्स स्टाईलवर ऑडिशन देऊ शकता. किमान १ मिनिट डान्स सादर करणे आवश्यक आहे.
५. ऑडिशनला वेशभूषा, रंगभूषा करण्याची आवश्यकता नाही.
६. तुम्ही ऑडिशन दिल्यानंतर तुमची निवड झाल्याचे तुम्हाला कॉल किंवा मेसेज करुन कळविले जाईल.
७. ‘तारका’ हा व्यावसायिक डान्स शो असल्याने ज्यांना नृत्य क्षेत्रात करिअर करावयाचे आहे व ज्यांना याची आवड आहे त्यांनीच ऑडिशन द्यावयाचे आहे. टाईमपास म्हणून कोणीही ऑडिशन देऊ नये.
८. ऑडीशनसाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही.
९. ऑडिशन वेळी कलाकारांनी वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.
या शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची ऑडिशन रविवार दिनांक ८ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता मराठा समाज हॉल, कुडाळ येथे होणार असून सर्वांनी मोठ्या संख्येने ऑडिशनमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचे संचालक रवी कुडाळकर यांनी केले आहे.













