“आजचा सत्कार, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील काळा दिवस”

कणकवली तालुक्यात लागलेले बॅनर ठरताहेत चर्चेचा विषय

“श्रीधर नाईक अमर रहे”, “सत्यविजय भिसे अमर रहे” असा देखील आहे बॅनरवर उल्लेख

बॅनरचा रोख शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यक्रमावर?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत आता राजकीयघडामोडींना वेग आला असून, एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचाउमेदवार अद्याप जाहीर झालेला नसताना काल मगळवारी शिवसेनेचाझालेला सत्कार सोहळा याचा संदर्भ घेत कणकवली शहरासहकणकवली तालुक्यात नांदगाव, तरेळे, कासारडे आधी ठिकाणीलावलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या बॅनर वर “आजचासत्कार, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील काळा दिवस” असाउल्लेख करत या बॅनर वर “श्रीधर नाईक अमर रहे” “सत्यविजय भिसेअमर रहे” असा उल्लेख केलेला आहे. “सत्यविजय भिसे आम्हालामाफ करा” असा देखील उल्लेख या बॅनर वर करण्यात आला आहे. याबॅनर वरील ओळीचा संदर्भ घेतला असता काल मगळवारी शिवसेनाठाकरे गटाकडून कणकवली भगवती मंगल कार्यालय या ठिकाणीमाजी आमदार परशुराम उपरकर व माजी आमदार राजन तेली यांचासत्कार करण्यात आला. सत्काराचा संदर्भ या बॅनर वर घेत हा बॅनरलावल्यत आल्याचे समजते. यामध्ये श्रीधर नाईक हत्येच्या गुन्ह्यातत्यावेळी परशुराम उपरकर संशयित आरोपी होते. मात्र त्यानंतर ते सदरकेस मध्ये निर्देश सुटले होते. तर सत्यविजय भिसे केस मध्ये देखीलराजन तेली हे संशयित आरोपी होते मात्र ते देखील या केस मध्येनिर्दोष सुटले होते. त्यामुळे उपरकर व तेली यांच्या सत्कारावर हासंदर्भ घेत भाष्य करणारे हे बॅनर असल्याची चर्चा कणकवलीत आहे.मात्र हा बॅनर कोणी लावला? ते अद्याप तरी गुलदस्त्यात आहे.कणकवली तालुक्यात नाक्या नाक्यांवर लागलेले हे बॅनर सध्या चर्चेचाविषय बनले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *