सतीश सावंत यांची राणे कुटुंबियांवर बोचरी टीका
संदेश पारकर यांचे आपल्या आक्रमक भूमिकेतून राणेंवर टीकास्त्र
माजी आमदार परशुराम उपरकर व माजी आमदार राजन तेली यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश झाल्यानंतर कणकवली विधानसभा शिवसेनेच्या वतीने या नवनिर्वाचित दोन्ही पदाधिकाऱ्यांचा कणकवलीत भव्य सत्कार करण्यात आला. कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय या ठिकाणी हा सत्कार झाला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, सरपंच बंडू ठाकूर, राजू राठोड, माजी सभापती आबू पटेल, मिलिंद साटम, प्रसाद करदिकर, वैदेही गुडेकर, माधवी दळवी, जयेश नर, यांच्यासह अन्य शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी भाषण करत असताना माजी आमदार राजन तेली यांनी आपापसात भांडू नका एकत्र व्हा व इच्छुकानी एकत्र येऊन लढा असे सांगितले. तर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी एकत्र येऊन काम करा प्रसंगी मारा, झोडा मी तुमच्या सोबत आहे. अशी आक्रमक भूमिका घेत 1990 मधील शिवसैनिकाची भूमिका बोलून दाखवली. अनेक पदाधिकाऱ्यांकडून उपरकर व राजन तेली यांचा सत्कार देखील करण्यात आला. त्यानंतर सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी भगवती हॉलमधून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत चालत येत छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार घातला व घोषणाबाजी देखील केली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश सावंत यांनी केले