मालवण : मनसे विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर पडवे येथील खाजगी रुग्णाल उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मालवण-देऊळवाडा येथील रहिवासी असलेल्या अमित इब्रामपूरकर यांनी मालवण येथील डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कुल येथे दहावी पर्यंतचे तर अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातून बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले. त्यानंतर मालवणच्या शासकीय तंत्रनिकेतन मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेऊन पदवी घेतली. तंत्रनिकेतन मध्ये शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे अमित इब्रामपूरकर हे त्यावेळी शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बनले. अमित इब्रामपूरकर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवितानाच अनेक आंदोलने उभारली. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर राज ठाकरे यांनी अमित इब्रामपूरकर यांच्यावर मनविसेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. इब्रामपूरकर यांनी मराठीच्या मुद्द्याबरोबरच परप्रांतीय फळविक्रेते, त्याकाळात मालवणात सुरु असलेल्या भुयारी गटार योजनेच्या नित्कृष्ट दर्जाच्या कामाबाबत स्पॉट पंचनामा करत नगरपालिका प्रशासनाला हादरवून सोडले होते. कोरोना काळातही त्यांनी रुग्णांना पक्षाच्या वतीने प्रसंगी स्व:खर्चाने सढळ हस्ते मदत करत सामाजिक बांधिलकी जोपासली. शासकीय ठेकेदार म्हणून काम करणाऱ्या अमित इब्रामपूरकर यांचे इंजिनियरिंग क्षेत्रात प्रभुत्व होते. मालवण तालुका सिव्हिल इंजिनियर असोसिएशनच्या सहखजिनदार पदावर ते कार्यरत होते. ते अविवाहित होते. आज सकाळी रेवतळे मालवण येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, वहिनी, भावोजी, पुतणी, भाचे असा परिवार आहे. मालवण पंचायत समितीचे सेवानिवृत्त अधीक्षक श्रीकृष्ण इब्रामपूरकर यांचे ते सुपुत्र होत.

मनसे विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाप्रमुख अमित इब्रामपूरकर यांचे निधन
1
/
102
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
पत्रकार शेखर सामंत यांनी सांगितला तो थरारक प्रसंग | Shekhar Samant #shekharsamant #tarunbharat
1
/
102

Subscribe









